विश्वात आपण एकटेच आहोत काय? | Vishwat aapan  ektech aahot kay

विश्वात आपण एकटेच आहोत काय? | Vishwat aapan ektech aahot kay

'या अफाट विश्वात आपण एकटेच आहोत काय? की आपल्याला कुणी साथीदार आहेत? आकाशगंगेत आपण एकमेवाद्वितीय आहोत? की ती प्रगत जीवसृष्टींनी गजबजलेली आहे? विश्वात लक्षावधी प्रगत संस्कृती असतील काय? असतील तर त्यांचेकडून अजून संदेश का आला नाही? जीवनाची उत्क्रांती निसर्गत: झाली आहे? की कुण्या महाशक्तीने जीवसृष्टी निर्माण केली आहे? फार फार पूर्वी अवकाशयात्री पृथ्वीवर आले होते काय? त्यांनी आपल्या भेटींचे पुरावे मागे ठेवले आहेत काय? आज शास्त्रज्ञांना पडलेल्या प्रश्नांची ही मालिका आहे. दुस-या टोकाचाही विचार आज मांडला जात आहे. आपल्या मानवजातीशिवाय या विश्वात दुसरं कुणीही नाही. आपण आहोत म्हणूनच विश्वाच्या अस्तित्वाला अर्थ आहे. परग्रहावरील प्रगत जीवसृष्टीचा शोध व्यर्थ आहे. अंधा-या खोलीत नसलेले काळे मांजर शोधण्याचा तो प्रकार आहे. तरीही सहस्रावधी शास्त्रज्ञ प्रगत संस्कृतीच्या शोधात आज गुंतलेले आहेत. आज ना उद्या त्यांचा संदेश येईल अशी त्यांना आशा आहे. विश्वात आपण एकटेच आहोत काय? हा ग्रंथ या मतामतांच्या गलबल्याचा एक आढावा आहे. '

'Pages: 142 Weight:0 ISBN:978-81-7434-149-5 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:फेब्रुवारी 2011 पहिली आवृत्ती:जुलै 1999 Illustrator:सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 110
Offer ₹ 99
You Save
₹ 11 (10%)
Out of Stock

More Books By Mohan Apte | मोहन आपटे