Rajhans Podcasts

मुस्लिम समाजाचं वास्तव चित्रण | Inshaallah | Abhiram Bhadkamkar | Marathi Novel

दारिद्र्यात पिचत असलेली मुस्लीम वस्ती. पैशाचा अभाव, शिक्षणाचा अभाव! अज्ञान, अस्वच्छता, व्यसनाधीनता यांनी ग्रस्त जीवन. एके दिवशी ती वस्ती ढवळून निघाली. वस्तीतल्या पोरांची धरपकड झाली. जुनैद घरी आलाच नाही, पकडलेल्या पोरांमध्येही तो नव्हता. कॉलेजमध्ये शिकणारा सरळ मुलगा! अभ्यासू, कविताप्रेमी! का झालं असं? का? का? का? त्या शहरातले हिंदू-मुस्लीम नेते, कार्यकर्ते, राजकारणी या सर्वांना चित्रित करत पुढे पुढे जाणारी कादंबरी. इन्शाअल्लाह'

Manik Moti | Manik Varma ani Parivar

‘माणिक वर्मा' असे नाव उच्चारले की, कानामनात रुणझुणू लागतात असंख्य भावगीते, भक्तिगीते अन् नाट्यगीते. शास्त्रीय संगीतातही आपले वेगळे वैशिष्ट्यपूर्ण स्थान त्यांनी निर्माण केले होते. संगीतक्षेत्रात त्यांनी जशी लखलखती कारकीर्द साकारली, तसाच स्वतंत्र ठसा वर्मा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या कार्यक्षेत्रात उमटवला. माणिकताईंचे पती अमर वर्मा हिंदी आणि उर्दूचे ख्यातकीर्त शायर. दोन कन्या - भारती आचरेकर अन् वंदना गुप्ते सुप्रसिद्ध अभिनेत्री, तर तिसरी कन्या राणी वर्मा नामवंत गायिका. चौथी कन्या अरुणा जयप्रकाश नामांकित फिजिओथेरपिस्ट. संपूर्ण वर्मा परिवार म्हणजे जणू विविध कलाक्षेत्रांमध्ये लाखो रसिकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवणारी अनमोल रत्ने. माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त या समग्र परिवाराच्या कलाकर्तृत्वाचा वेध घेणार्‍या स्मृतिचित्रांचा वेधक शब्दपट म्हणजे 'माणिक मोती - माणिक वर्मा आणि परिवार' हे पुस्तक

शोध बदलत्या पृथ्वीचा | Suneet Potnis

आपल्या पृथ्वीची निर्मिती झाली सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी. जन्मापासून आजपर्यंत तिच्या प्रकृतीत सततचे बदल चालूच आहेत. तिच्या अंतरंगात चाललेल्या प्रचंड घडामोडींचा आणि त्यामुळे तिच्या प्राकृतिक घटकांमध्ये अन् बाह्य रूपामध्ये होणार्‍या बदलांचा शोध अन् वेध घेणं ही कधीही न संपणारी गोष्ट! कोट्यवधी वर्षांपासून चालू असलेल्या या बदलांना कारणीभूत असलेल्या ज्वालामुखी, भूकंप, सुनामी, चक्रीवादळे यांसारख्या प्रचंड उलथापालथींबाबतची शास्त्रीय माहिती जिज्ञासू वाचकाला रंजक आणि सुबोध पद्धतीने स्पष्ट करून सांगणारे - शोध बदलत्या पृथ्वीचा

लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या कै. सुनीताबाई देशपांडे यांना १०० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! यानिमित्त खास २५% सवलतीत उपलब्ध - ३/ ४/ ५

निवृत्त प्राध्यापक आणि विभागप्रमुख, (श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई.) डॉ. अनंत देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - यानिमित्त खास २५% सूट - १/ २/ ३

Rangancha Jadoogar | रंगांचा जादूगार
Rangancha Jadoogar | रंगांचा जादूगार Dr. Anant Deshmukh | डॉ. अनंत देशमुख
128 170
ADD TO CART

महाराष्ट्र कृषी दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा - यानिमित्त खास २५% सवलतीत उपलब्ध - १/ २/ ३

सी. ए. डे आणि डॉक्टर्स डे निमित्त मन:पूर्वक शुभेच्छा !

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या वार्षिक पुरस्कारांनी सन्मानित 'राजहंसी' इंद्रधनुष्य ! सर्व 'राजहंसी' प्रतिभावंतांचे मन:पूर्वक अभिनंदन !!

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे प्रकाशकांसाठीचे उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०२५ जाहीर - लेखकांचे मन:पूर्वक अभिनंदन !

वाचकांच्या अंगणात नव्याने उतरलेली