Ghumakkadi | घुमक्क्डी
सरधोपटता वजा केली,
की तुम्हाला थोडं अधिक चांगलं लिहिता येऊ शकतं,
हे नोरा एफ्रॉन या विदुषीचं तत्त्वज्ञान कविता महाजन यांनी
त्यांच्या कथात्म लेखनकाळातच ओळखलं होतं.
अकथनात्मक लेखन, अनुवादासाठी देशाच्या कानाकोपर्यातील
लेखक-लेखिकांचं वाचन, संपादन
या सर्व बाबींमुळे त्यांच्या लेखणीला धार आलेली दिसते.
रा. भि. जोशींच्या प्रवासलेखनकुळाशी
बरंचसं जवळचं नातं सांगणार्या
‘घुमक्कडी' या पुस्तकामध्येही आहे
प्रवासाच्या गोष्टी आणि गोष्टींचा प्रवास.
तो किती खोलवर आहे,
याचा अंदाज यातील कोणताही लेख वाचल्यानंतर उमजून येईल.
पृथ्वीची उत्पत्ती, सूर्याची, अग्नीची, पावसाची इतकंच नाही,
तर मिठाची उत्पत्ती याबद्दलच्या लोककथांचा प्रवास
कविता महाजनांच्या प्रवासाशी एकरूप होऊन
रूढार्थानं प्रवासवर्णन नसलेलं
एक अचंबित करणारं पुस्तक तयार झालंय.
ब्लॉगसाठी लिहिल्या गेलेल्या या प्रवासनोंदी,
पण अत्यंत गंभीर आणि अनंत तपशिलांना कवेत घेणार्या.
- बाईंडिंग : हार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५ " X ८.५ "
- पहिली आवृत्ती : जुलै २०२५
- मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी
- राजहंस क्रमांक : G-02-2025