Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Home / Authors / डॉ.गायत्री हर्षे
डॉ.गायत्री हर्षे
डॉ.गायत्री हर्षे

डॉ. गायत्री गुरुदास हर्षे ह्या कोल्हापूर येथे वास्तव्यास असून गेली ४२ वर्षे वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यामध्ये आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईमध्ये झाले. मुंबईतील नायर हॉस्पिटलमधून एमबीबीएस झाल्यानंतर १९८२मध्ये त्यांनी मेडिसीन या विषयात पदव्युत्तर शिक्षण (एमडी) घेतले. विवाहानंतर त्या कोल्हापूरमध्ये स्थायिक झाल्या. त्यांचे पती डॉ. गुरुदास हे ख्यातनाम मनोविकारतज्ज्ञ आहेत. १९८४पासून मोठ्या कष्टाने दोघांनी रुग्णालय सुरू केले आणि १९९७मध्ये ते मोठे केले आहे. २०१५पासून त्यांचा मुलगा आणि सून दोघेही एमडी होऊन या रुग्णालयाचे संवर्धक आहेत, ही गोष्ट मोलाची आहे, असे त्यांना वाटते.
शिवाय त्या नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे आणि ते शिष्य समाजात यशस्वी कारकीर्द घडवीत आहेत.
२००५ पासून आपला देश आणि त्याचबरोबर विविध देश पाहण्याची आवड त्या दोघांना निर्माण झाली आणि वैद्यकीय व्यवसायात स्थिरावल्याने त्यासाठी मोकळा वेळ काढता येऊ लागला हेही तितकेच खरे. आतापर्यंत
जवळजवळ ४० देश त्या दोघांनी भरपूर वेळ देऊन बघितले आहेत. कोणत्याही संस्थेमार्फत न जाता स्वतः त्या त्या देशांची 'Lonely Planet' सारखी माहितीपर पुस्तके वाचून, त्यानुसार हा प्रवास त्यांनी केला आहे. तशीच ही अंटार्क्टिकाची साहसयात्रा एका छोट्याशा शिडांच्या नौकेतून या दोघांनी केली. तेही २०१४मध्ये सर्वांना या रोमहर्षक आणि अद्भुत प्रदेशाचा परिचय व्हावा म्हणून. ह्या धाडसी मोहिमेचे इतिवृत्त पुस्तकरूपाने गायत्रीताईंनी प्रकाशित केले आहे.

डॉ.गायत्री हर्षे ह्यांची पुस्तके