निसर्गाचे गणित | Nisargache Ganit

निसर्गाचे गणित | Nisargache Ganit

'खरा प्रतिभासंपन्न गणिती आहे, निसर्ग. पानांत आणि फुलांत, पशूंत आणि पक्ष्यांत, मानवांत आणि फळाफुलांनी डवरलेल्या सृष्टीत, जिथे पाहावं, तिथे निसर्गानं गणित कोरलं आहे. निसर्गाचं गणित शुष्क नाही, नीरस नाही, रटाळ नाही आणि क्लिष्ट तर नाहीच नाही. निसर्गाचं गणित सौंदर्यानं ओतप्रोत भरलेलं आहे. निसर्गाच्या गणितात एक दिमाख आहे, सौष्ठव आहे. एका साध्या संख्याशृंखलेतून त्याचं प्रत्यंतर येतं. त्या शृंखलेच्या गुणधर्मात आपलं मन हरवून जातं. असं काही असू शकेल, याचं आपल्याला आश्र्चर्य वाटतं, फुलांच्या पाकळ्यांत, वनस्पतींच्या पानांत, सुंदर सुंदर कलाकृतींत आणि मानवाच्या आकारांत, भूमितीच्या आकृत्यांत आणि साध्या साध्या खेळांत, ही संख्याशृंखला प्रकटते, सा-या सा-या निसर्गात. अशा या अद्भुत शृंखलेचे विविध आविष्कार हाच ‘निसर्गाचे गणित ’ या पुस्तकाचा विषय आहे. '

'Pages: 134 Weight:150 ISBN:978-81-7434-088-7 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:मार्च 2012 पहिली आवृत्ती:जुलै 1993 Illustrator:अनिल दाभाडे'

M.R.P ₹ 110
Offer ₹ 99
You Save
₹ 11 (10%)
Out of Stock

More Books By Mohan Apte | मोहन आपटे