Home / Authors / Mangala Godbole | मंगला गोडबोले
Mangala Godbole | मंगला गोडबोले
Mangala Godbole | मंगला गोडबोले

जन्म : २ फेब्रुवारी १९४९
शिक्षण : बी.ए. (मराठी/मानसशास्त्र), एल्फिन्स्टन महाविद्यालय, मुंबई; १९६८
एम.ए. (मराठी / भाषाशास्त्र) मुंबई विद्यापीठ, १९७०
एम.ए. परीक्षेत प्रथम क्रमांक, नॅशनल स्कॉलरशिप,
दक्षिणा फेलोशिप यांसह, न. चिं. केळकर सुवर्णपदक प्राप्त.
कार्यभार : महिला महाविद्यालय, विलेपार्ले इथे अध्यापन, १९७०-७१
‘स्त्री’ मासिकात संपादन साहाय्य, १९८०-८४
‘माहेर’ मासिकात संपादन साहाय्य, १९८८-२०१०
पुरस्कार : उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती- महाराष्ट्र शासन
* वयात येताना : १९८६-८७
* अल्बम : १९९९-२०००
* अशी घरं... अशी माणसं : २००१-२००२
* काय तुझ्या मनात? : २००४-२००५
* पर्स हरवलेली बाई : २००५-२००६
* पण बोलणार आहे : २००९-२०१०
* सही रे सही : २०१०-२०११
* ऋतू हिरवट : २०१४
* सती ते सरोगसी : २०१८
महाराष्ट्र साहित्य परिषद
* पुन्हा झुळूक : चिं. वि. जोशी पुरस्कार- उत्कृष्ट विनोदी पुस्तक,१९८९
* ‘निरोप’ (लेख) : अनंत काणेकर पुरस्कार- उत्कृष्ट ललित गद्य, १९९०
* सौ. शांताबाई शिरोळे पुरस्कार, लक्षणीय लेखिका, २००१.
* सही रे सही : वि. वि. बोकील पुरस्कार- बालसाहित्य,२०१०
इतर पुरस्कार
* वर्धापनदिन पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालय, १९९८.
* सु. ल. गद्रे मातोश्री पुरस्कार, १९९९.
* यशोदाबाई शिरुडे पुरस्कार, कोथरूड उपनगर साहित्य संमेलन, २०००.
* आडवळण : सार्वजनिक वाचनालय, नाशिक, वि. मा. दी.पटवर्धन पुरस्कार, २००१.
* दिवा : उत्कृष्ट लेखिका पुरस्कार, २००४.
* ब्रह्मवाक्य : मॅजेस्टिक प्रकाशनाचा जयवंत दळवी पुरस्कार,२००४.
* साहित्य क्षेत्राचा जीवनगौरव पुरस्कार, वनिता समाज, दादर,२००९.
* पण बोलणार आहे : अभिरुची गौरव पुरस्कार,
मराठी वाङ्मय परिषद, बडोदे, २०११
* साहित्यिक कामगिरीचा जीवनगौरव पुरस्कार,अ‍ॅड. डी. आर. नगरकर फाउंडेशन, पुणे, २०१४.
* साहित्य सेवा कृतज्ञता पुरस्कार, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, २०२२

आकाशवाणीवर विपुल लेखन व नभोनाट्यांच्या अखिल भारतीय स्पर्धेत दोन नभोनाट्यांची निवड, त्यांचे सर्व भारतीय भाषांमध्ये अनुवाद.
काही लेखन हिंदी, गुजराती, इंग्रजी व कानडी भाषेत अनुवादित.
बालभारतीच्या मराठी गद्यपद्यसंग्रहात लेखनाचा समावेश.

Mangala Godbole | मंगला गोडबोले ह्यांची पुस्तके