
Tichi Katha | तिची कथा
ह्या ‘ती’ ला विशिष्ट नाव नाही. ‘स्त्री’ हीच तिची
ओळख. आयुष्यभर तिला सोबत फक्त नानाविध
दु:खांची !
धर्माच्या नावाखाली तिचा छळ मांडणा-या जाचक
परंपरा खंडित झाल्या ख-या, पण प्रश्न संपले
नाहीत. जगण्याच्या नव्या पद्धतीतून तिच्यासाठी
नवे प्रश्न निर्माण होतच राहिले.
यातनांचे, पीडेचे प्रकार बदलेले पण दुख:ची जात
तीच-जीवघेणी! तिचं शिक्षण, तिचं आर्थिक
स्वावलंबन, तिचं कर्तृत्व-सगळं खोट! खरं फक्त
तिचं ‘स्त्री’ असणं !
ती अडाणी कामकरी असो अथवा वकील, डॉक्टर,
इंजीनियर असो, तिच्या स्तरात तिला भेटणारा
पुरूष आणि त्याचा समाज तिची छळणूक करीतच
राहिला.
स्त्रीच्या जगण्याचा गेल्या शंभर वर्षांचा हा साहित्यिक
इतिहास म्हणजे खरं तर प्रत्येकीची कथा !
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : नोव्हेंबर १९९७
- सद्य आवृत्ती : जुलै २०१२
- मुखपृष्ठ : नितीन दादरावाला
- राजहंस क्रमांक : K-04-1997
More Books By Mangala Athalekar | मंगला आठलेकर

₹248
₹275

₹338
₹375

₹113
₹125
Out of Stock