Maharshi te Gauri | महर्षी ते गौरी

Maharshi te Gauri | महर्षी ते गौरी

समाजानं घालून दिलेल्या रूढ-परंपरांच्या चौकटीच्या 

धाकाला न बधलेलं कर्वे घराणं. 

शिक्षणानं स्त्री स्वावलंबी बनेल या विश्र्वासानं स्त्री 

शिक्षणाचा आग्रह धरणारे आणि त्यासाठी आपलं 

सारं आयुष्य वेचणारे महर्षी कर्वे ! 

संतती नियमन आणि समागम स्वातंत्र्य या दोन 

गोष्टींनीच स्त्रीला मानसिक, शारीरिक आरोग्य लाभेल 

हे आपलं मत तर्कशुध्दपणे मांडताना समाजाशी 

एकाकी झुंज देणारे र. धों. कर्वे ! 

आणि सत्तेच्या खेळाला मान्यता न देता 

व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणा-या गौरी देशपांडे ! 

या तीन नावांनी कर्वे घराण्याच्या तीन पिढया 

स्त्री-स्वातंत्र्याच्या प्रश्नांशी जोडल्या गेल्या. 

त्यांच्या रक्तातून वारसाहक्कानं प्रवाही झाले केवळ 

पुरोगामी विचार. 

स्त्री आज थोडंफार मोकळेपणानं जगत असेल तर 

त्या श्रेयात कर्वे घराण्याचा वाटा मोठा आहे. 

स्त्री-स्वातंत्र्याच्या इतिहासातील काही पाने कर्वे 

घराण्यातील या तीन व्यक्तिंचा इतिहासच आहेत. 

ISBN: 978-81-7434-151-8
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : जानेवारी १९९९
  • सद्य आवृत्ती : ऑगस्ट २०१२
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
  • राजहंस क्रमांक : A-01-1999
M.R.P ₹ 150
Offer ₹ 135
You Save ₹ 15 (10%)

More Books By Mangala Athalekar | मंगला आठलेकर