Panipat | पानिपत

Panipat | पानिपत

'महाराष्ट्राच्या पुढ्यात विधात्याने असे शिवधनुष्य कधीच टाकले नसेल. परक्या घुसखोराला हिंदुस्थानबाहेर हाकलून देण्यासाठी मराठी मनगटानेही या शिवधनुष्याला जिद्दीने, इरेसरीने हात घातला. मराठी पठारावरचे असे एक गाव, एक घर एक उंबरठा नव्हता; अशी एखादी जात, पोटजात, बलुता नव्हता, सारा महाराष्ट्र एकदिलाने मौजूद होता. काळाशीही चार हात करीन, प्रलयाशी झुंजता झगडता तुटेन, फुटेन पण मागे हटणार नाही. अशा निश्चयाने पानिपतचा वीर सदाशिवरावभाऊ रणात गाडून उभा राहिला. वैऱ्याचा विजयाचा आनंद विरून जावा अशी पराक्रमाची शर्थ करून पस्तीस हजार कटिल मराठी स्वारांनी पानिपतावर देह ठेवला. मराठी मातीच्या, मराठी मनाच्या सर्वोच्च सद्गुणांचा अन् दुर्गुणांचा मिलाफ झालेल्या या ऐतिहासिक रणाला नव्या अस्सल कागदपत्रांच्या आधारे जिवंत करणारी कादंबरी. '

पहिली आवृत्ती - जानेवारी १९८८
सद्य आवृत्ती - एप्रिल २०२४
चित्रकार - रविन्द्र मेस्त्री' / आतील व्यक्तिचित्रे व प्रसंगचित्रे - संजय शेलार / मांडणी - बाबू उडुपी
बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
आकार - ५.५." X ८.५"
बुक कोड - A-01-1988

M.R.P ₹ 500
Offer ₹ 450
You Save
₹ 50 (10%)