
Mahanayak (Sampadit Avrutti) | महानायक (संपादित आवृत्ती)
अडतीस कोटी देशबांधवांची गुलामीतून मुक्तता;
याच एका प्राणप्रिय ध्येयासाठी एका कडव्या,
लढवय्या देशभक्ताने अर्ध्या जगात मारलेली
गरुडभरारी !
जीवनभरचा धगधगता संघर्ष, जिवलग स्वकीयांशी
आणि ब्रिटिश साम्राज्यासारख्या परकीयांशीही. त्याला
व्यक्ती म्हणून नव्हे, तर एक लढाऊ राष्ट्र मानून,
जपानसारख्या हिशेबी देशानेही अभूतपूर्व मदत केली.
'चलो दिल्ली'ची त्याची गर्जना साकारण्यासाठी
इंफाळ-कोहिमा-ब्रह्मदेशाच्या अरण्यात जुंपला एक
घना रणसंग्राम ! नियतीच्या आडव्यातिडव्या भेसूर
नाचानेही ज्याची कवचकुंडले कधीही निस्तेज झाली
नाहीत असा - महानायक !
देशोदेशींच्या दफ्तरखान्यांत आजवर अडकून
पडलेल्या दुर्मिळ दस्तऐवजांचा, नव्या संशोधित
कागदपत्रांचा वेध घेऊन व त्या 'रणवाटा'वरून
भ्रमण करून चितारलेली नेताजींची अपरिचित
जीवनकहाणी.
ISBN: 978-81-7434-860-9
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : ११ नोव्हेंबर १९९८
- सद्य आवृत्ती : जून २०२५
- मुखपृष्ठ व आतील मांडणी : सतीश देशपांडे
- 'महानायक' अक्षरलेखन : कमल शेडगे
- राजहंस क्रमांक : K-02-1998