Gargi Ajun Jeevant Aahe | गार्गी अजून जिवंत आहे
'सा-या ब्रह्मवृंदासमोर याज्ञवल्क्याच्या बुद्धिमत्तेला आव्हान देणारे, त्याला हैराण करणारे प्रश्न विचारीत अखेर त्याला सर्वश्रेष्ठत्वाचं प्रशस्तिपत्रक देणा-या गार्गीचा काळ खूप मागे पडला. पण गार्गी अजून जिवंत आहे. एकोणीसशे चौदाच्या आसपास उत्तर प्रदेशमधल्या एका छोट्याशा खेडेगावात जन्मलेली गुलाब! वयाच्या अकराव्या वर्षी तिनं तत्कालीन ब्राह्मणवर्गाला प्रश्न केला, `अंत्यविधीचे कार्य करण्याचा अधिकार स्त्रीला का नाही?’ नुसता प्रश्न विचारून गुलाब थांबली नाही, तर सा-या विरोधाला मोडून काढून गंगेच्या किनारी तिनं स्वतःचा घाट बांधला. रसुलाबाद घाट! तिच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचा सा-या घाटावर दरारा आहे. भले भले ज्ञानी पंडित तिच्यासमोर नतमस्तक आहे. तिच्याकडे पाहताना गार्गीचा भास होतो. आणि मनात येतं, कोण म्हणतं गार्गी भूतकाळात जमा झाली? गार्गी अजून जिवंत आहे... '
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५ " X ८.५"
पहिली आवृत्ती : फेब्रुवारी २००२
सद्य आवृत्ती : ऑगस्ट २०१४
मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'