
Dr. Khankhoje (Nahi Chira...) | डॉ. खानखोजे (नाही चिरा...)
लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून १९०६ साली
त्याने मायदेश सोडला.
अमेरिकेत कृषिशिक्षण घेत असतानाच त्याने क्रांतिकेंद्रे काढली.
गदर उठावाच्या आखणीत तो आघाडीवर होता. लाला हरदयाळ,
पं. काशीराम, विष्णू गणेश पिंगळे, वीरेन्द्रनाथ चट्टोपाध्याय,
भूपेंद्रनाथ दत्त हे क्रांतिकारक त्याचे सहकारी होते.
सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी त्याने जपान, अमेरिका,
कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन अशी भ्रमंती केली आणि
अपार साहसे अंगावर घेतली.
डॉ. सन् यत सेन आणि डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हे त्याचे
आदर्श होते. म्हणूनच सशस्त्र स्वातंत्र्यलढयानंतर पंचवीस वर्षे
मेक्सिकोत कृषिक्रांती घडवून आणण्यासाठी तो झटत होता.
स्वराज्य मिळाल्यानंतर त्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी
तो मोठया उमेदीने मायदेशी परतला.
इथे मात्र या महान क्रांतिकारक नि श्रेष्ठ आंतरराष्ट्रीय कृषितज्ज्ञाच्या
वाटयाला आली
ना चिरा ..... ना पणती ....
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : ऑगस्ट १९९७
- सद्य आवृत्ती : जून २०२४
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
- राजहंस क्रमांक : H-01-1997
More Books By Veena Gavankar | वीणा गवाणकर
