Chandrashekhar | चंद्रशेखर

Chandrashekhar | चंद्रशेखर

'भारतात जन्मलेल्या आणि इंग्लंड-अमेरिकेत कर्तृत्व गाजवलेल्या एका नोबेल पारितोषिकविजेत्या शास्त्रज्ञाचे - डॉ. सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांचे - हे चरित्र आहे. भारतातल्या प्रारंभिक शिक्षणापासून अमेरिकेतल्या प्रगत संशोधनापर्यंत त्यांचा जीवनप्रवाह कसा वाहत गेला, त्याने कोणकोणती वळणे घेतली, याचा हा वेधक वृत्तांत आहे. श्वेतबटू किंवा कृष्णविवर यांच्यासारख्या क्लिष्ट, अगम्य वाटणा-या विषयांमध्ये त्यांनी केलेले संशोधन, त्या संशोधनाला खूप विलंबाने मिळालेली मान्यता आणि त्या विलंबामुळे निराश न होता त्यांनी प्राध्यापकीपासून ग्रंथलेखनापर्यंत विविध क्षेत्रांत केलेले मौलिक कार्य, मायदेशी परतण्याऐवजी अमेरिकन नागरिकत्व स्वीकारण्याचा त्यांनी जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय, शेक्सपीयर- बिथोव्हन-न्यूटन या दिग्गजांच्या सृजनशीलतेची वैज्ञानिक दृष्टीने त्यांनी केलेली आस्वादक चिकित्सा...'

'Pages - 182 Weight - 210 ISBN - 978-81-7434-682-7 Binding - Card Binding Size - 5.5 X 8.5 सद्य आवृत्ती - मे 2014 पहिली आवृत्ती - फेब्रुवारी 2005 Illlustrator - सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 175
Offer ₹ 158
You Save
₹ 17 (10%)

More Books By Madhuri Shanbhag | माधुरी शानभाग