Home / Authors / Madhuri Shanbhag
Madhuri Shanbhag
Madhuri Shanbhag

माधुरी मोहन शानभाग (माहेरच्या गीता प्रभू आजगावकर) या एक मराठी लेखिका आहेत. त्या पदार्थविज्ञानाच्या प्राध्यापिका असून कॉलेजच्या प्राचार्या आहेत. माधुरी शानभाग यांनी २५हून अधिक मराठी पुस्तके लिहिली आहेत. त्या पुस्तकांत चरित्रे, विज्ञानकथा, कादंबऱ्या आणि लघुकथासंग्रहही आहेत. त्यांनी अनेक इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत.

* शानभाग मूळच्या बेळगावच्या आहेत व तेथेच वाढलेल्या आहेत.

* अग्निपंख/अग्नी सिरागुगल (अनुवादित, मूळ इंग्रजी, विंग्ज ऑफ फायर, लेखक - ए.पी.जे. अब्दुल कलाम) - १४हून अधिक आवृत्या. (अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही या पुस्तकात फार सुंदरपणे वाचकांना सांगितली आहे. हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईची तयारी आहे.).

* अंतरी वीणा झंकारती
* काचकमळ (कथासंग्रह)
* चकवा
* चेहरे (कथासंग्रह)
* जेआरडी- एक चतुरस्र माणूस
* डॉक्टर्स फ्रॉम हेल (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - व्हिवियन स्पिझ)
* तमाच्या तळाशी (मनोवैज्ञानिक कादंबरी). नवचैतन्य प्रकाशन
* तिची गोष्ट
* नीरसी मोहमाया : नवचैतन्य प्रकाशन
* नोबेल पारितोषक विजेते चंद्रशेखर (चरित्र)
* पळसाची पाने
* पुनर्जन्म (विज्ञानकथा)
* ब्रेनवेव्ह्‌ज (कादंबरी)
* मुंगी उडाली आकाशी
* रिचर्ड फेनमन : एक अवलिया संशोधक (चरित्र)
* लेटर्स टु अ यंग सायंटिस्‍ट (अनुवादित, मूळ इंग्रजी, लेखक - डॉ. एडवर्ड ओ. विल्सन), राजहंस प्रकाशन
* वाटेवरचे रंगतरंग (प्रवासवर्णन)
* समुद्र (कथासंग्रह). नवचैतन्य प्रकाशन
* सावरीची पिसे (ललित लेखसंग्रह)
* सी.एन.आर. राव : अनोख्या रसायनाने बनलेला माणूस (चरित्र)
* स्त्रियांचे सक्षमीकरण, शासकीय पोलीससेवा, निवृत्ती आणि प्रशासन (मूळ इंग्रजी, लेखिका - किरण बेदी)
* स्वप्‍नाकडून सत्याकडे (कल्पना चावलाची कहाणी) - मेहता प्रकाशन

Madhuri Shanbhag ह्यांची पुस्तके