Tyanantar ... | त्यानंतर ...
मराठी कवितेच्या प्रवासातील सुमारे पाच
दशकांहून अधिक काळ व्यापून असलेले,
मराठी कवितेला वेगळे वळण
आणि परिणामकारक बळ देणारे
म्हणून समजले गेलेले कवी म्हणजे
श्रीपाद भालचंद्र जोशी !
‘सळाळ आणि सळाळनंतर...’, ‘समांतर’,
‘मथितार्थ’ व ‘इत्यादि’ या कवितासंग्रहांनंतरचा
त्यांचा हा पाचवा कवितासंग्रह.
गेल्या अर्धशतकातील वेगाने बदलत्या जीवनाच्या
सार्याच पातळ्या, आयाम, बाजू, संबंध, गुंतागुंत
समग्रपणे कवेत घेणार्या,
‘मोठ्या समाजमनाचे प्रतिंबिंब’ अन्
‘मोठ्या कालखंडाचा कॅनव्हास’ घेऊन
काव्यकृती साकारणार्या या कवीचा काव्यप्रवास
शैली, आशय व चिंतनदृष्ट्या आपल्या
वेगळेपणाने नजरेत भरतो आहे.
ISBN: 978-81-19625-90-1
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : एप्रिल २०२५
- मुखपृष्ठ : सतीश भावसार
- राजहंस क्रमांक : D-04-2025