
The Secret Mission | द सिक्रेट मिशन
धनेशने पोलिस व्हॅन मधेच थांबवली. बुरखाधारी आणि जगदाळे
अचंबित नजरेने धनेशकडे बघत होते. इन्स्पेक्टर धनेशने निर्विकार
चेह-याने खिशातल्या पिस्तुलाकडे हात नेताच जगदाळे हादरले.
बुरखाधारी तर चळाचळा कापायलाच लागला.
‘‘साहेब, काय करताय ? ह्या झाडीत निर्जन आडवाटेला गाडी का
थांबवली तुम्ही ? तुमच्या मनात नेमकं काय चाललंय ?''
एकावर एक प्रश्न... पण धनेशच्या चेह-यावरून त्याच्या पुढच्या
चालीचा अंदाजच लागत नव्हता. त्याने पिस्तूल बुरखाधा-याच्या
कनपटीवर टेकवत हातातले कागद त्याला दिले. हा अडाणी जंगली
माणूस इंग्लिशमधले कागद कसे वाचणार ? साहेब हे काय करताहेत ?
जगदाळेंना कळतच नव्हते. बुरखाधा-याने कागदांवर नजर टाकली
अन् धनेशच्या पायांवर लोळण घेतली. नेमका आहे तरी काय हा
सगळा प्रकार ? धनेशने कोणते पेपर्स त्याला दाखवले ?
काय होते त्यात ? कोणत्या रहस्याचा खुलासा करणार होती
ती कागदपत्रे ? धनेश अखेरीस करणारच का
बुरखाधा-याचा एन्काउन्टर ? का ? काय आहे काय हे ?
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५'" X ८.५"
- पहिली आवृत्ती : एप्रिल २०२४
- मुखपृष्ठ सुलेखन : मोहन थत्ते
- मुखपृष्ठ : तृप्ती देशपांडे
- राजहंस क्रमांक : D-06-2024