Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन

Savaliche Gane | सावलीचे गाणे

कधी उगवेल असा

 सूर्य माझा माझ्यासाठी

 सारा सरेल अंधार

 होई प्रकाशाची दिठी

नदी वाहील वाहील 

कधी माझ्या प्रवाहाने

 पाणी असेलच माझे 

आणि माझेच वाहणे

असे असेल असेल 

सारे फक्त माझे 

माझे माती असेलच माझी

 आणि माझेच रुजणे

भय अवघे संपेल 

आणि होईल जगणे 

एक आनंदाचे झाड

 एक सावलीचे गाणे

ISBN: ISBN 978-93-48736-15-4
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : ऑक्टो. २०२५
  • मुखपृष्ठ : अन्वर हुसेन
  • राजहंस क्रमांक :J -02-2025
M.R.P ₹ 180
Offer ₹ 162
You Save ₹ 18 (10%)