प्राक्-सिनेमा | Prak-Cinema

प्राक्-सिनेमा | Prak-Cinema

सिने-दिग्दर्शक, सिनेविद, सिनेअध्यापक, लेखक अरुण खोपकर यांचे ‘प्राक्-सिनेमा’ हे त्यांच्या कलाविचारांच्या त्रयीतील ‘अनुनाद’ व ‘कालकल्लोळ’ नंतरचे अप्रतिम पुस्तक आहे. सिनेमाने अवघ्या सव्वाशे वर्षांच्या आयुष्यात मानवी जीवनावर सखोल परिणाम केला आहे. हजारो वर्षांच्या कालावधीत उत्क्रान्त झालेल्या मानवी कलांना आणि विज्ञानाला अंगभूत करून घेण्याची शक्ती त्याने कमावली आहे. आदिमानवाने काढलेली गुहाचित्रे, जादूटोणा, पाषाणशिल्पे, प्राचीन वास्तू, लोककला, धार्मिक विधी, नृत्य, नाट्य, संगीत, साहित्य इ. यांच्या प्राचीन ते आधुनिकोत्तरपर्यंतच्या प्रयोगांची सारतत्त्वे सिनेमात आहेत. ती सुगम भाषेत उलगडून सिनेमाचे हे अनेक अवतार जोडणारे पुस्तक म्हणजे ‘प्राक्-सिनेमा’. चित्रपटनिर्मितीचा अनुभव आणि जगभरच्या प्रवासातले अभिजात वास्तूंचे, कलाकृतींचे संवेदनशील अवलोकन यांना चिंतनाची चौकट लाभल्याने मांडणी भरीव आणि तर्कसिद्ध झाली आहे. चर्चित वास्तूंत व वस्तूंत अजिंठा-घारापुरीची लेणी व दक्षिण भारतातील मंदिरे, मध्य आशियातल्या मशिदी, युरोपातली प्राचीन व आधुनिक चर्चेस आणि अत्याधुनिक दृक्-कलांची उदाहरणे आहेत. लेओनार्दोच्या जोडीला पर्शिअन व मोगल मिनिएचर्स आहेत. मातिस व पिकासो आहेत. कथकली आणि भरतनाट्यमबरोबर विविध भाषांतल्या साहित्यकृतींचे विश्लेषणही आहे. अभिजात सिनेमाच्या विकासातील सर्व कलांचा व शास्त्रांचा लक्षणीय सहभाग इथे अलगदपणे मांडला आहे. साकल्याने विचार करण्याच्या खोपकरांच्या आग्रही भूमिकेमुळे आणि आयुष्यभराच्या शोधवृत्तीमुळेच सिनेमामागचा सिनेमा उलगडण्याचा हा प्रयत्न साकार झालेला आहे. अशा स्वरूपाचे पुस्तक भारतातच काय, जागतिक वाङ्मयातही अनन्य ठरावे! चंद्रकांत पाटील


M.R.P ₹ 700
Offer ₹ 630
You Save
₹ 70 (10%)