Home / Authors / Arun Khopkar | अरुण खोपकर
Arun Khopkar | अरुण खोपकर
Arun Khopkar | अरुण खोपकर

अरुण वसंत खोपकर (जन्म : मुंबई, ५ नोव्हेंबर, इ.स. १९४५) हे एक मराठी लेखक, लघुचित्रपट निर्माते व चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांना मराठीसह एकूण बारा भाषा येतात.

रेडिओवरील कारकीर्द
अरुण खोपकर सातवी आठवीपासूनच रंगमंचावर वावरायला लागले. त्यानंतर रेडिओवर लहान मुलांच्या 'गंमतजंमत' या कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला, तेव्हा त्यांची व पुलंची ओळख झाली. रेडिओवर त्यानंतर ते श्री.ना. पेंडसे यांच्या 'हत्या' या कादंबरीच्या वाचनातही खोपकर सहभागी झाले. खोपकरांनी रेडिओवरील बऱ्याच म्हणजे ७०-८० श्रुतिका केल्या.

नाटके
खोपकरांनी पुढे नाटकातही कामे केली. भक्ती बर्वे, सुधा करमरकर, वसुंधरा पेंडसे या त्यांच्यासोबत होत्या. त्या काळात त्या 'नाट्यनिकेतन'च्या दौऱ्यांवरही गेल्या होत्या. तेव्हा बालमोहन नाट्यसंस्थेमध्ये गंगाधर पाटील, गुमास्ते हे शिक्षक होते. पाटीलसरांनी त्यांचा कल ओळखला आणि त्यांना प्रोत्साहन दिले. या अभिनयाच्या अनुभवांतर अरुण खोपकर साहित्यलेखनाकडे वळले.

साहित्य आणि चित्रपट
* आषाढका एक दिन (चित्रपटातील भूमिका)
* इमेजेस ऑफ इंडिया : माय टाऊन (माहितीपट, १९८८)
* ओरल सेल्फ एक्झॅमिनेशन (माहितीपट, १९८९)
* कथा दोन गणपतरावांची (पटकथा)
* Confronting Tobacco (Documentary, १९८४)
* कलर्स ऑफ ॲबसेन्स (माहितीपट, १९९३)
* Computer-aided Design (Documentary, १९७६)
* गुरुदत्त - तीन अंकी शोकांतिका (मराठी, राष्ट्रीय पुरस्कारप्रारप्त पुस्तक)
* Guru Dutt - A Tragedy in Three Acts
* ग्रामायण (माहितीपट, १९८१)
* चलत्‌-चित्रव्यूह (मराठी)
* वास्तुरचनाकार चार्ल्स कोरिया यांच्यावरील ’व्हॉल्युम झीरो’ हा लघुपट
* चित्रव्यूह (मराठी)
* Tobacco Habits and Oral Cancer (Documentary, १९७७)
* Threads that Bind (चित्रपट दिग्दर्शन)
* डिप्लोमा
’* नारायण गंगाराम सुर्वे’ हा नारायण सुर्वे यांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोत टाकणारा लघुपट
निर्णय (चित्रपट)
* प्रवाही (माहितीपट)
* फिगर्स ऑफ थॉट हा लघुपट (१९९०)
* रसिकप्रिया (लघुपट)
* लीला सॅम्पसन (लघुपट)
* लोकप्रिया (लघुपट)
* व्हॉल्यूम झीरो (लघुपट)
* संचारी (भरत नाट्य संदर्भात लीला सॅम्सन यांच्याशी संवाद साधणारा माहितीपट, १९९१)
* हाथी का अंडा (चित्रपट, २००२)

पुरस्कार

खोपकर यांच्या लघुपटांना तीनदा राष्ट्रीय सुवर्णकमळ पुरस्कार मिळाले आहेत.
त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सोच समझ के या चित्रपटाला मे १३ १९९६ रोजी कुटुंब कल्याण या विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.
त्यांच्या 'चलत्-चित्रव्यूह' आणि ’चित्रव्यूह’ या चरित्रात्मक निबंधांच्या जोड पुस्तकांना २०१५ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

Arun Khopkar | अरुण खोपकर ह्यांची पुस्तके