 
            Mee Sakha Meghdoot | मी सखा मेघदूत
कविकुलगुरू कालिदासाचे ‘मेघदूत’ हे खंडकाव्य म्हणजे
अभिजात गीर्वाणभाषेचा एक अनुपम अलंकार!
पत्नीच्या विरहाने व्याकुळलेल्या यक्षाने आपला संदेश घेऊन
एका मेघालाच रामगिरीहून अलकानगरीकडे जाण्याची विनवणी केली.
यक्षाने या आपल्या दूताला त्याच्या प्रस्तावित प्रवासपथाचे वाटेतल्या
सार्या खाणाखुणांसकट मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे हा मेघदूत
अलकानगरीला पोहोचला का? त्याला ती यक्षपत्नी भेटली का?
तिने या दूताकडे आपल्या पतीसाठी-यक्षासाठी काही सांगावा धाडला का?
या सार्यांची उत्तरे सांगत आहेत हर्षदा पंडित.
कालिदासाच्या ‘मेघदूता’चा जणू ‘सिक्वेल’ म्हणजे – मी सखा मेघदूत
                ISBN: 978-93-91469-95-5
            
            
            - बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५ " X ८.५"
- पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २०२३
- चित्रकार व आतील रेखाटने : सतीश भावसार
- राजहंस क्रमांक : J-03-2023
 
                            