Apale Vartan-Apala Mendoo | आपले वर्तन - आपला मेंदू

Apale Vartan-Apala Mendoo | आपले वर्तन - आपला मेंदू

आपल्या मेंदूवर अवलंबून असते आपले वर्तन आणि आपल्या वर्तनाने आपला मेंदूही बदलू शकतो. मानवी वर्तन अनेक चलपदांवर (variables) आधारित असते. त्यातील सर्वांत महत्त्वाची चलपदे म्हणजे भावभावना. या अमूर्त भावभावना कोट्यवधी वर्षे उत्क्रांत झाल्या आहेत. अशा अमूर्त गोष्टींचा शोधविचार तत्त्वज्ञान, धर्म, ईश्वरशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, साहित्य, कला या सर्वांनी केला आहे आणि करतही आहेत. अलीकडच्या काळात प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करून मानवी वर्तनावर प्रकाश टाकण्याचे काम विज्ञानानेही अंगावर घेतले आहे. विज्ञानाच्या या शाखेला वर्तनविज्ञान (Ethology) म्हणतात. जसजसा मेंदूविज्ञानाचा आणि त्याला पूरक व पोषक जैवतंत्रज्ञानाचा विकास होत गेला, तसतसा संशोधनाचा दिशाकोन बदलत गेला. मानवी भावभावनांची आणि पर्यायाने मानवी वर्तनाची पाळेमुळे मेंदूत असली पाहिजेत, या विज्ञानाच्या विचारधारेला बळकटी आली. मेंदूविज्ञानाबद्दल कुतूहल जागृत करणारे आपले वर्तन आपला मेंदू

पहिली आवृत्ती - फेब्रुवारी २०२४
मुखपृष्ठ, व आतील मांडणी : सतीश भावसार
बाईंडिंग -कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५०'" X ८.५०"
बुक कोड - B-03-2024

M.R.P ₹ 440
Offer ₹ 330
You Save
₹ 110 (25%)