
Agnipankh | अग्निपंख
तामिळनाडूमधील रामेश्वरम या छोटया धर्मक्षेत्री
एका अशिक्षित नावाडयाच्या पोटी
१९३१ मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच
देशातील भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे
आजचे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम.
या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या
आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतानाच
दुस-या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग
या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही
फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे.
हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून
स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचे एक स्पंदन आहे.
जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि
विज्ञानाची ती कहाणी आहे;
तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे
ते मनोहारी खंडकाव्यही आहे.
ISBN: 978-81-7434-880-7
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : में १९९९
- सद्य आवृत्ती : मार्च २०२५
- चित्रकार : सतीश देशपांडे
- राजहंस क्रमांक : E-01-1999