Home / Authors / Madhuri Talwalkar | माधुरी तळवलकर
Madhuri Talwalkar | माधुरी तळवलकर

* माधुरी तळवलकर यांनी पुणे येथील टेल्को कंपनी, तसेच सकाळ पेपर्स लि. पुणे इथे एकूण वीस वर्षे नोकरी केली.

* आतापर्यंत त्यांची तेवीस पुस्तके प्रकाशित झाली असून त्यातील पाच पुस्तके अनुवादित आहेत.

* अविवाहिता ही त्यांची कथा एफ वाय बी ए च्या अभ्यासक्रमात नेमलेली आहे.

* मिळून सा-याजणी या मासिकाने गेल्या पंचवीस वर्षातील अंकांमधून पंधरा सर्वोत्कृष्ट कथांची निवड करून प्रकाशित केलेल्या सा-या जणींच्या कथा पुस्तकात कैद नावाच्या कथेचा समावेश.

* झुंबर या लेखसंग्रहामधे साठ विविध विषयांवर रोचक लेख असून पाणकळा या कादंबरीचे संक्षिप्तीकरण केलेले पुस्तक प्रकाशित.

* साहित्यातील वेचक-वेधक या आस्वादात्मक समीक्षा असलेल्या पुस्तकाची व धुके दाटलेले या कादंबरीची दुसरी आवृत्ती प्रकाशित.

* शीळ व एका फांदीवरची पाखरं या दोन कादंब-या प्रकाशित

* माधवी महाजनी यांचे भुलले मी.. हे शब्दांकन केलेले आत्म चरित्र व अष्टपैलू व्यक्तिमत्वासाठी रामदासांची शिकवण व दोन अनुवादित पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर.

*** पुरस्कार
* किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या 'तळ्याचे गुपित' या कादंबरीस मुंबई येथील पार्वतीबाई आव्हाड स्मृती राज्यस्तरीय उत्कृष्ट बाल वाड्मय पुरस्कार मिळाला असून या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित.

* लहान मुलांसाठी लिहिलेल्या सात पुस्तकातील जंगलचा फेरफटका या चित्रमय पुस्तकास मराठी बालकुमार साहित्यसभा, कोल्हापूर यांच्याकडून पुरस्कार.

* कॉलसेंटर डॉट कॉम या कादंबरीस राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट वाड्मयाचा पुरस्कार.

* आजरा येथून मृत्युंजय पुरस्कार मिळाला असून या कादंबरीची दुसरी आवृत्ती प्रकाशित.

* कॉलसेंटर डॉट कॉम व व्यक्तिमत्व फुलताना ही दोन पुस्तके ब्रेल लिपीत झालेली आहेत.

* तनहाई या कथासंग्रहातील कैद नावाच्या कथेस पुण्यातील महाराष्ट्र साहिय परिषदेचा गंगाधर गाडगीळ कथा पुरस्कार प्राप्त.

* काळंपांढरं या तीन दीर्घ कथांच्या पुस्तकास राजेंद्र बनहट्टी पुरस्कार हा प्रतिष्ठेचापुरस्कार मिळाला

Madhuri Talwalkar | माधुरी तळवलकर ह्यांची पुस्तके