YouTube व्हिडिओ

राजहंस प्रकाशन | संवाद राजहंसी सारस्वतांशी | डॉ. मृदुला बेळे

एखादा आजार पसरणे, त्यावर लस किंवा औषधाची निर्मिती होणे आणि विशिष्ट कंपनीचे औषध सामान्यांपर्यंत पोहोचणे इतकेच आपल्याला माहीत असते. पण या औषधनिर्मितीला याशिवायही अनेक पैलू असतात. 'सिप्ला' या भारतीय औषध कंपनीने एड्सच्या विळख्यातून रुग्णांना सोडविण्यासाठी दिलेली झुंज समजून घेऊया 'राजहंस प्रकाशना'च्या 'अशीही एक झुंज' या पुस्तकातून. या पुस्तकाविषयी संवाद साधत आहेत लेखिका मृदुला बेळे.

राजहंस प्रकाशन | गोष्ट राजहंसी पुस्तकाची | जॉर्ज ऑर्वेल – करुन जावे असे काही

गोष्ट राजहंसी पुस्तकाची ‘जॉर्ज ऑर्वेल – करुन जावे असे काही’ जॉर्ज ऑर्वेल म्हणजे नामवंत रशियन लेखक. त्यांनी राष्ट्रवाद, समाजवाद, लोकशाही, साम्यवाद, वंशवाद, अशा एक ना अनेक संकल्पना अतिशय नेमकेपणाने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडल्या. आज इतक्या वर्षानंतरही त्यांचे लेखन जगभरात अभ्यासले जाते. तत्कालिन जागतिक राजकारण आणि समाजकारण यावर भाष्य करणारे जॉर्ज ऑर्वेल लेखक म्हणून जितके मोठे होते तितकेच ते व्यक्ती म्हणूनही प्रतिभावान होते. अशा जागतिक किर्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे मराठीतील चरित्र म्हणजे ‘राजहंस प्रकाशन’चे ‘जॉर्ज ऑर्वेल – करुन जावे असे काही’ हे नवीन पुस्तक. जाणून घेऊया या पुस्तकाचा प्रवास लेखिका विशाखा पाटील यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधत आहेत सोनाली नवांगुळ.

राजहंस प्रकाशन । संवाद राजहंसी सारस्वतांशी । कवी - पवन नालट

एका तरुण कवीने सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वास्तवाला कवितेतून फोडलेली वाचा म्हणजे ‘मी संदर्भ पोखरतोय’. या कविता संग्रहातून कवी आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर भाष्य करत नेमके प्रश्न उपस्थित करतो. ‘राजहंस प्रकाशना’तर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या या कविता संग्रहाविषयी सांगताहेत कवी पवन नालट…

राजहंस प्रकाशन | तीन चाकांवरील 'राजहंसी ज्ञानदूत' उपक्रमाचा शुभारंभ

तीन चाकांवरील राजहंसी ज्ञानदूत’ उपक्रमाचा शुभारंभ वाचकांना आता रिक्षा प्रवासादरम्यान ‘राजहंसी’ पुस्तके खरेदी करता येणार आहेत. मराठी भाषा दिनानिमित्त ‘राजहंस प्रकाशना’च्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा शुभारंभ झाला. सध्या प्रायोगिक तत्त्वावर १० रिक्षांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या शुभारंभाचे काही क्षण...

राजहंस प्रकाशन | संवाद राजहंसी सारस्वतांशी | लेखक - सुनील शिरवाडकर

सोनं हा अनेकांचा विशेषतः महिला वर्गाचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. दागिने घडतात म्हणजे नेमकं काय? सोन्यातील गुंतवणूक फायद्याची की तोट्याची? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे म्हणजे 'राजहंस प्रकाशना'चे 'सोन्याच्या संगतीत' हे पुस्तक. अनेक वर्षं सोन्याच्या संगतीत घालवल्यानंतर लेखक सुनील शिरवाडकर यांनी आपला हा प्रवास शब्दबद्ध केला. याच प्रवासाविषयी जाणून घेऊया त्यांच्याकडून....