Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Vachik Abhinay | वाचिक अभिनय

Vachik Abhinay | वाचिक अभिनय

हॅम्लेट - "बोलण्यात नेमस्तपणा ठेवला 

म्हणजे भाषण चित्तवेधक होते. पुष्कळदा 

कर्कश नट क्यें करून जेव्हां ओरडतात, 

तेव्हां माझ्या पायाची आग मस्तकात चढते. 

असल्या मूर्खपणाने रस उत्पन्न न होता 

भाषणाच्या चिंधडयान् चिंधडया होतात. 

"पण, त्राटिकेचा सूर काढू नको असे म्हटले 

म्हणून आपला तोंडतल्या तोंडात मुळमुळ 

करीत बसशील. पण तेही उपयोगाचे नाही. 

या कामात ज्याची त्याने अक्कल खर्चिली 

पाहिजे; पढवून किती येणार ? भाषण आणि 

अभिनय ही एकमेकांना जुळून चालली 

पाहिजेत. 

"हजारो अरसिक प्रेक्षकांनी टाळी दिली, पण 

सहृदय प्रेक्षकांपैकी एकाने जरी नाक मुरडले, 

तरी सर्व खेळावर पाणी पडले असे तुम्ही 

मानले पाहिजे. असे कित्येक नाटकवाले 

आहेत की, ज्यांची अरसिक व मूर्ख लोक 

पराकाष्ठेची वाखाणणी करीत असतात, पण 

त्यांच्यात गुण म्हणाल तर काडीचा देखील 

नसतो. हे बेटे मनुष्यस्वभावाची इतकी खराब 

बतावणी करतात की, त्यामुळे मला कधी 

कधी वाटते की, या लोकांना आमच्या 

नेहमीच्या ब्रह्मदेवाने घडविलेले नसावे, तर 

त्यांच्याकरिता कोणी तरी भाडोत्री ब्रह्मदेव 

धरून आणला असावा."

- शेक्स्पिअर 

(भाषांतर : गोपाळ गणेश आगरकर) 

इ. स. १८८३ 

ISBN: 978-81-7434-846-3
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : ऑगस्ट १९९८
  • सद्य आवृत्ती: एप्रिल २०२४
  • मुखपृष्ठ व आतील मांडणी : सतीश देशपांडे
  • आतील आकृत्या : मुकुंद तळवलकर
  • मुखपृष्ठावरील छायाचित्र : संजय शेंडे
  • राजहंस क्रमांक : H-01-1998
M.R.P ₹ 160
Offer ₹ 144
You Save ₹ 16 (10%)

More Books By Dr. Shriram Lagoo | डॉ. श्रीराम लागू