Home / Authors / Dr. Shriram Lagoo | डॉ. श्रीराम लागू
Dr. Shriram Lagoo | डॉ. श्रीराम लागू
Dr. Shriram Lagoo | डॉ. श्रीराम लागू

डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू (जन्म : सातारा, १६ नोव्हेंबर १९२७; - पुणे, १७ डिसेंबर २०१९

* हे मराठी व हिंदी नाट्यसृष्टी-चित्रपटसृष्टीतील अभिनेते व दिग्दर्शक होते. देवाला रिटायर करा असे म्हणत त्यांनी पुरोगामी आणि आणि तर्कसंगत सामाजिक कारणांसाठी आवाज उठवला होता.

* सुरुवातीचे जीवन
श्रीराम लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ या दिवशी झाला. डॉ. बाळकृष्ण चिंतामण लागू हे पिता तर सत्यभामा लागू या त्यांच्या माता आहेत. त्यांचे शिक्षण भावे हायस्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या संस्थांतून झाले.

*** कारकीर्द
* वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना श्रीराम लागू यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली व नंतर भालबा केळकर यांसारख्या समविचारी वरिष्ठ स्नेह्यांसमवेत पुरोगामी नाट्य संस्था सुरू केली.[३]

* १९५० च्या दशकात त्यांनी कान नाक घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात ५ वर्षे काम केले ब नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले.

* १९६० च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. भारतात असताना पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे आणि रंगायन, मुंबई यांच्यामार्फत रंगमंचावरील कामही सुरू होते.

* शेवटी १९६९ मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. नंतर सिंहासन, पिंजरा, मुक्ता सारख्या अनेक चित्रपटांतून कामही केले. त्यांच्या पत्‍नी दीपा लागू या ख्यातनाम नाट्यअभिनेत्री आहेत.

*** पुस्तके
* झाकोळ (पटकथा)
* डॉ. श्रीराम लागू यांचे निवडक लेख, मुलाखती, भाषणे इत्यादींचा संग्रह असलेले ’रूपवेध’ नावाचे पुस्तक आहे. पुस्तकाला डॉ. पुष्पा भावे यांची प्रदीर्घ प्रस्तावना आहे.
* "लमाण" हे डॉ. श्रीराम लागू यांचे आत्मचरित्र पॉप्युलर प्रकाशन यांनी सन २००४ मध्ये प्रकाशित केले आहे.

*** पुरस्कार
* फिल्मफेअर पुरस्कार - १९७८ - 'मुख्य सहायक अभिनेता' घरोंदा (हिंदी)
* १९९७, कालिदास सन्मान
* २००६, चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील योगदानाबद्दल मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे जीवनगौरव पुरस्कार.
* २०१०, संगीत नाटक अकादमी फेलोशिप
* २०१२, राजश्री शाहू कला गौरव पुरस्कार

Dr. Shriram Lagoo | डॉ. श्रीराम लागू ह्यांची पुस्तके