Dharankala | धरणकळा
मूठभर धान्य पेरावं तर मालकीची जमीन नाही.
तरीही आम्ही गाववाले. भुमिपुत्र.
आमचा गाव. आमचा देव.
आम्ही पाटील, आम्ही देशमुख.
दारूच्या नादात बडेजाव.
‘जवळ नाही आटा अन् टेरीला उटणं वाटा’ अशी गत.
भैताडांना हे कळंना की कुठं राहिलाय तुमचा गाव ?
गैबान्यांनो, होतं ते विकून बसलात,
आता पार्टीच्या जिवावर उड्या मारताय,
त्यांच्या हातचं बाहुलं झालाय. उद्या खेळ संपेल.
बाहुलं फेकलं जाईल. पार सांदी कोपऱ्यात !
तुम्हाला या मातीत पाय ठेवता येणार नाही.
आज पार्टीवाला देवाचा भंडारा करतोय. पैसा देतोय.
उद्या तो तुमच्या देवालाही जुमानणार नाही.
                ISBN: 978-81-951708-5-2
            
            
            - पहिली आवृत्ती : ५ नोव्हेंबर २०२१
 - मुखपृष्ठ : जयदीप कडू
 - आतील मांडणी : ल. म. कडू
 - बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
 - आकार : ५.५ " X ८.५"
 - बुक कोड : K-04-2021