Suranchi Samaradnee : Lata Mangeshkar | सुरांची सम्राज्ञी : लता मंगेशकर
लताचा आवाज ‘पल्याडच्या' दुनियेशी आपलं नातं जोडील
अशा विलक्षण मधुर ताकदीचा होता. संगीत हे परमेश्वरापर्यंत
पोहोचायचं साधन असेल, तर त्या प्रवासाला स्वत:च्या
आवाजाचा मखमली रस्ता दिला, तो लताबाईंनी.
पायांखाली सतरंजी असायचीसुद्धा ऐपत नसणार्यांच्या
पायांखाली गुलाबाच्या पाकळ्या अंथरल्या, त्या लताच्या आवाजानं,
तिच्या सुरांनी. एकेका स्वराचा, लयीचा, तालाचा आनंद घेत आणि
मुक्तहस्तांनी आनंद वाटून देत आली लताची गाणी..
राग, अनुराग, प्रणय, मीलन, विरह, रुसवा, वंचना, निराशा, पश्चाताप,
वात्सल्य, हर्ष, खेद... अशा अनंत भावछटांना लताच्या आवाजानं
मूर्तरूप दिलं. या दैवी आवाजाची ना कुणाला व्याख्या करता आली,
ना तो संगीताच्या कुठल्या गणिती मोजपट्टीत किंवा व्याकरणात
बसवता आला. त्या अपूर्व स्वरलेण्याला ही विनम्र आदरांजली,
लताबाईंच्याच निवडक पंचवीस गीतांच्या शब्द-सूर-अर्थ-आस्वादाच्या साथीने...
-
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८ .५"
- पहिली आवृत्ती : डिसेंबर २०२४
- मुखपृष्ठ : तृप्ती देशपांडे
- सुलेखन : बाबू उडुपी
- राजहंस क्रमांक : L-04-2024
 
                             
      
                                 
             
                         
                         
                        