
Savashna | सवाष्ण
लाकडी नक्षीकामानं सजलेल्या, पण आता जीर्ण झालेल्या
ऐसपैस दरवाजात, त्या वाड्याच्या उंब-यात पाऊल घोटाळतंय.
इथल्या घरधनिणीनं सालंकृत पावलांनी इथेच माप ओलांडलं असेल का ?
अंगणानं ओंजळीत रांगोळीची नक्षी घेऊन वाट पाहिली असेल का
त्या मंगल क्षणाची...? आता तो सगळा दिमाख ओसरलाय...
कोनाड्यातलं देवघर... आत डोकावलं तर मिणमिणत्या उजेडात
आश्वस्त करणारी पितळी मूर्त कुणाची ? अंधा-या जिन्यातून जाताना
वाटलं, कितीतरी पैंजण आपल्या स्वारींची वाट पाहत अगतिक थांबले
असतील का ? मोठ्ठा चौक. त्यात एक तोंडापर्यंत पुरलेला रांजण.
त्यातल्या अंधाराच्या पोटात हरवलेत का या वाड्यातले चैतन्यस्वर ?
का ? काय घडलं असं ? मनाला साखळदंडासारखे लोंबकळत
असलेले अनुत्तरित प्रश्न. त्यांचं ओझं घेऊन मला निघावं लागतंय.
कधी होईल का या रहस्यांचा उलगडा ? माझ्या प्रश्नांची कालकुपीत
दडलेली उत्तरं, इतिहासपुरुषा, तुला माहीत असतील का रे ?
- पहिली आवृत्ती : एप्रिल २०२४
- मुखपृष्ठ सुलेखन : मोहन थत्ते
- मुखपृष्ठ : तृप्ती देशपांडे
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५'" X ८.५"
- बुक कोड : D-09-2024