 
            Rajdhanitun | राजधानीतून
'जवळजवळ एक तप महाराष्ट टाइम्सचे
विशेष प्रतिनिधी म्हणून राजधानी दिल्लीत
काम करताना अशोक जैन यांनी अनेक
राजकीय चढउतार पाहिले. जनता पक्षाची
पडझड, इंदिरा गांधींचं पुनरागमन, जुन्या
पक्षांची तोडफोड, नव्या पक्षांची स्थापना,
इंदिरांजींची हत्या, राजीव गांधींची कारर्कीद
-- या सर्व घडामोडीचे साक्षीदार असलेल्या
जैन यांना कधी कोणाच्या नावाचा टिळा
लावला नाही किंवा कोणत्याही पक्षाची
पताका खांद्यावर घेतली नाही. एका तटस्थ
पत्रकाराच्या भूमिकेतून त्यांनी अनेक नेत्यांची
व घटनांची रोमहर्षक शब्दचित्र रेखाटून
तो अवघा माहोल आपल्या रसरशीत शैलीत
उभा केला. राजकारणाची व दिल्लीची स्पंदनं
टिपणारं हे चटकदार लेखन जणू चकित
करणा-या, चकविणा-या, चक्रावून
टाकणा-या दिल्लीची आधुनिक बखरच !
धावती, ओघवती नि झगमगती ! '
                ISBN: 978-81-7434-229-4
            
            
            - बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : एप्रिल २००२
- सद्य आवृत्ती : फेब्रुवारी २०२५
- मुखपृष्ठ आणि आतील मांडणी : सतीश देशपांडे'
 
                             
      
                                 
                 
                 
                