Matrusookta | मातृसूक्त
लेकराचा जन्म होतो आणि नाळ कापली जाते. लेकराचं अस्तित्व आईपासून स्वतंत्र होतं; पण शेवटपर्यंत नाभीची खूण देहाला सोडत नाही आणि मनातला आईचा दरवळ थांबत नाही. आई असताना-नसतानाचे भावविभोर काळाचे तुकडे गुंफून हा मातृसूक्ताचा लोभस कोलाज तयार झाला आहे. ‘आई गंऽऽ’ या सहजोद्गाराचा मनस्वी विस्तार या कवितांतून जाणवत राहतो. पानोपानी, ओळीओळीत नि शब्दाशब्दात आई भरून आहे. बापू दासरींच्या या कवितेत भारावून टाकणारी विलक्षण मातृलय आहे. ही नाभीतून उगवलेली कविता वाचकांच्या मनात आईची ऊब उजागर करते. दासू वैद्य
ISBN: 978-81-19625-81-9