Manik Moti - Mani Varma Ani Parivar | माणिक मोती - माणिक वर्मा आणि परिवार
‘माणिक वर्मा' असे नाव उच्चारले की,
कानामनात रुणझुणू लागतात
असंख्य भावगीते, भक्तिगीते अन् नाट्यगीते.
शास्त्रीय संगीतातही आपले वेगळे वैशिष्ट्यपूर्ण स्थान
त्यांनी निर्माण केले होते.
संगीतक्षेत्रात त्यांनी जशी लखलखती कारकीर्द साकारली,
तसाच स्वतंत्र ठसा वर्मा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने
आपापल्या कार्यक्षेत्रात उमटवला.
माणिकताईंचे पती अमर वर्मा हिंदी आणि
उर्दूचे ख्यातकीर्त शायर.
दोन कन्या - भारती आचरेकर अन् वंदना गुप्ते
सुप्रसिद्ध अभिनेत्री,
तर तिसरी कन्या राणी वर्मा नामवंत गायिका.
चौथी कन्या अरुणा जयप्रकाश नामांकित फिजिओथेरपिस्ट.
संपूर्ण वर्मा परिवार म्हणजे जणू विविध कलाक्षेत्रांमध्ये
लाखो रसिकांच्या हृदयात अढळ स्थान
मिळवणारी अनमोल रत्ने.
माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त
या समग्र परिवाराच्या कलाकर्तृत्वाचा वेध घेणार्या
स्मृतिचित्रांचा वेधक शब्दपट -
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५ " X ८.५ "
- पहिली आवृत्ती : १२ मे २०२५
- मुखपृष्ठ व आतील मांडणी : सतीश भावसार
- यूट्यूब ध्वनिसंकलन / छायाचित्रे / विशेष साहाय्य : राणी वर्मा
- राजहंस क्रमांक : D-02-2025