काश्मीर :एक शापित नंदनवन (संक्षिप्त आवृती) | Kashmir : Ek Shapit Nandanwan (Sankshipt Awrutti)

काश्मीर :एक शापित नंदनवन (संक्षिप्त आवृती) | Kashmir : Ek Shapit Nandanwan (Sankshipt Awrutti)

'काश्मीर :एक शापित नंदनवन याच नावाच्या १९९५ साली प्रसिद्घ झालेल्या ग्रंथाची ही संक्षिप्त आवृती. ग्रंथ संक्षिप्त केलेला असला तरी काश्मीर-समस्या मात्र वाढलेली आहे; अधिकच गंभीर, स्फोटक बनलेली आहे! या ग्रंथाचा हेतू काश्मीर-प्रश्न मुळात काय आहे व तो का सुटत नाही, याचे सत्यकथन हा आहे.  तेथील महाराजांना भारतात विलीन व्हावयाचे नव्हते, हा प्रवाद खरा आहे काय?  त्यांना पाकिस्तानात विलीन होण्याचा सल्ला भारताने का दिला होता?  संस्थानांच्या विलीकरणाचे भारताचे धोरण कोणते होते?  विलीन करून घेताना सार्वमताचे लेखी आकश्र्वासन का देण्यात आले?  तरीही नंतर सार्वमत का घेतले गेले नाही?  घटनेत ३७० कलम कसे व कशासाठी आले?  पं. नेहरूंनी पंतप्रधान शेख अब्दुल्लांना कारागृहात का टाकले?  तेथे अराजकाची व दहशतवादाची सुरूवात केव्हा झाली? या व अशा अनेक प्रश्नांची खरी उत्तरे या ग्रंथात सापडतील. भरभक्कम पुराव्यांनिशी यात मांडलेले दाहक सत्य कितीही अप्रिय वाटले तरी राष्ट्रासाठी ते समजून घ्यावेच लागेल. कोणत्याही राष्ट्रीय प्रश्नाच्या ख-या स्वरूपाचे अज्ञान हाच मूलत: एक राष्ट्रीय शाप आहे. म्हणूनच काश्मीर हे ‘शापित नंदनवन’ ठरले आहे! '

'Pages: 272 Weight:-- ISBN:978-81-7434-203-4 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती: डिसेंबर २०२३ पहिली आवृत्ती:जुलै 2001 Illustrator:सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 350
Offer ₹ 315
You Save
₹ 35 (10%)

More Books By Sheshrao More | शेषराव मोरे