Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Done That, Been There  | डंदॅट  बींदेअर्

Done That, Been There | डंदॅट बींदेअर्

हे भुयार आहे की विवर हे समजत नाही. आणि दिवा दाखवायला कुणी नाही. आठवणींच्या गच्च रानात हरवल्यावर हाक दयायाला कुणी नाही. मडक्यांची पुन्हा माती होताना कुणीच सोबत नाही. आणि या वाहत्या नदीच्या पाण्याचा ठाव घेता येत नाही. हे नीट उमगल्यावर माणूस स्वतःशी बोलू लागतो का ? आणि हे असं स्वतःशी बोलणंच असतं का लिहिणं वगैरे ? लिहिणाऱ्या समोर ठाकणारे असे अनेक प्रश्न.. ज्यांची उत्तरं लिहिणाऱ्याला लिहिता लिहिताच उमगत जातात. दुसरे आपल्याला समजतात, तितके मूर्ख आपण खचितच नसतो. पण आपण स्वतःला समजतो, तितके शहाणेही आपण क्वचितच असतो ! लिहिताना आणि लिहिल्यावर काय काय झालं, यातली तथ्यं मी मांडताना हे शक्य आहे, की'या तथ्यांच्या जबड्यातून निसटून, सत्य कदाचित् दूर कुठेतरी एकटंच बागडत असेल!

ISBN: 978-93-5619-776-3
  • बाईंडिंग : हार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८ .५"
  • पहिली आवृत्ती : २५ डिसेंबर २०२५
  • मुखपृष्ठ : अपूर्वा पेंढारकर
M.R.P ₹ 400
Offer ₹ 360
You Save ₹ 40 (10%)