अलवार मनाची हुरहुर | Alwar Manachi Hurhur

अलवार मनाची हुरहुर | Alwar Manachi Hurhur

या कहाणीचा नायक आहे - विनायक महादेव कुलकर्णी. एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला. परिस्थितीशी झगडत शिकला – सवरलेला. मोठ्या उमेदीनं तो बांधकामव्यवसायात शिरला. मात्र खाजगीकरण, उदारीकरण अन् जागतिकीकरण यांचे सुसाट वारे वाहू लागले. बघता बघता वादळाचं रूप घेतलेल्या या परिस्थितीनं विनायकच्या आयुष्यातही उलथापालथ घडवली. चांगल्या-वाइटाचा विचार न करता भौतिक सुखांमागे धावणारी आसक्ती, त्यातून मानसिक अस्वस्थता, भ्रष्ट आचरण, गुन्हेगारी वृत्ती, नैतिकतेचा ऱ्हास या चक्रव्यूहात सापडून विनायकची होलपट झाली. चक्रव्यूह भेदण्यात तो यशस्वी ठरला की धारातीर्थी पडला? मनावर चढणारी व्यावहारिक काजळी तो साफ करू शकला का? एकीकडे ऐहिक उपलब्धी, तर दुसरीकडे हरवलेले मन:स्वास्थ्य. एकीकडे भ्रष्टाचाराच्या गाळात रुतत जाणारी सामाजिक परिस्थिती, तर दुसरीकडे मनाची मशागत करणाऱ्या मूल्यांबद्दलची ओढ. एका संवेदनशील माणसाच्या आयुष्याची वेधक कहाणी.


M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save
₹ 20 (10%)