Home / Authors / W. K. Lele | वा. के. लेले
W. K. Lele | वा. के. लेले
W. K. Lele | वा. के. लेले

जन्म : मुंबई, २९ मे १९३३ मृत्यू : १३ फेब्रुवारी २००७

*** शिक्षण
* एम.ए. प्रथम वर्ग (मुंबई विद्यापीठ, १९५६
* मराठी विषयात सर्वप्रथम आल्याबद्दल न.चिं. केळकर सुवर्णपदक प्राप्त
* पीएचडी (पुणे विद्यापीठ, १९७०)

*** व्यवसाय व अनुभव
* ३६ वर्षे मराठी ह्या विषयाचे विद्यापीठ स्तरावर अध्यापन केल्यावर जून १९९३ मध्ये मराठीचा प्राध्यापक ह्या पदावरून काशी हिंदू विश्व विद्यालयामधून सेवानिवृत्त.

*** लेखन-संशोधनाचे विशेष विषय :
* प्राचीन भारतीय साहित्यमीमांसा, पाश्चात्य शैलीशास्त्र , प्राचीन शास्त्रीय ग्रंथांची रचनापद्धती, परिवर्तित वाक्यसर्जक व्याकरण, मराठी साहित्य .

*** प्रकाशित साहित्य
* भाषांतरित व स्वतंत्र मिळून एकूण २८ पुस्तके.

*** प्रमुख स्वतंत्र पुस्तके अशी :
* औचित्यसिद्धांत आणि औचित्यविचार चर्चा l भारतीय काव्य शास्त्रीची उत्क्रान्ती: प्रथम युग l काव्य, शास्त्र व संस्कृति l विचार और विवेचन l गजेन्द्रमोक्ष l The Doctrine of the Tantrayuktis l काव्य्सूत्रसंहिता l ललितलेखन व शैली l ज्ञानेश्वरीचा शास्त्रीय अभ्यास l वाग्विलास l भाषा, साहित्य व शास्त्र : काही विचार lशैलीशास्त्र भामह l शांकुतल शैलीशास्त्रीय अभ्यास l

* वाक्य्कोश भाग 1 / २ / ३
* भाषा : स्वरूप, सामर्थ्य व सौन्दर्य
* A Critical study of Vamans's Kavyakabjarasutrani
* Methodogy of Acient Indian Sciences

*** पारितोषिके व पुरस्कार
* महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार (१९६८, १९७१, १९८७)
* महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेची वार्षिक पारितोषिके (१९६९ व १९७६)
* त्याच संस्थेचे 'अमृत महोत्सव विशेष पारितोषिक' (१९७१)
* मुंबई विद्यापीठाचे दादोबा पांडुरंग तर्खडकर पारितोषिक (१९७० व १९७६)
* पुणे विद्यापीठाचे डॉ. य.वि.परांजपे पारितोषिक व न.चिं. केळकर पारितोषिक (१९६९-७०)
* पुणे विद्यापीठाचा संत ज्ञानदेव पुरस्कार (१९८८)
* भारत सरकारचा विश्व विद्यालयस्तरीय मौलिक ग्रंथासाठी राष्ट्रीय पुरस्कार. (१९८१)
* उत्तर प्रदेश हिन्दी संस्थान (लखनौ) चा सौहार्द सम्मान पुरस्कार (१९९१-९२)
* महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) चे प्रा. रा.श्री. जोग समीक्षा पारितोषिक (१९९५-९६)
* ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्था (पुणे)चा पं. राजाराम शास्त्री नाटेकर गौरव पुरस्कार (१९९७)
* महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाड्मय दादोबा पांडुरंग पुरस्कार (२००४-०५)

W. K. Lele | वा. के. लेले ह्यांची पुस्तके