युगपुरुषी नेतृत्व : नेल्सन मंडेला | Yugpurushi Netrutva : Nelsan Mandela

युगपुरुषी नेतृत्व : नेल्सन मंडेला | Yugpurushi Netrutva : Nelsan Mandela

'देशाला गौरव मिळवून देणारा खेळाडू असो वा विरोधी पक्षनेता, तुटक वृत्तीचा शेजारी असो वा धडधडत्या मनानं मुलाखत घेणारा पत्रकार-वेगवेगळ्या निमित्तांनी नेल्सन मंडेलांशी थेट संर्पकात आलेल्या सर्वांचा अनुभव एकच- मंडेलांच्या नेतृत्वाला शब्दांपलीकडच्या महानतेचं कोंदण आहे! भेटणा-या प्रत्येकाचं मन निखळ, निर्व्याज वृत्तीनं जिंकणं आणि अनायासच त्याला जन्मभर पुरणा-या स्फूर्तीनं भारून टाकणं हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं सहजसुंदर वैशिष्टय! मंडेलांचे स्वभावगुण आणि त्यांच्या बावनकशी नेतृत्वशैलीतून खूप काही शिकण्यासारखं आहे, यांत्रिकपणे जगताना माणूसपणाचा विसर पडलेल्या तुम्हा-आम्हा सर्वांना सहजगत्या जागं करणारं हे पुस्तक ज्याला कुठल्याही क्षेत्रात अनुयायांचं परिवर्तन ‘मनुष्य बळात’ करायचं आहे अशा नेत्याला मार्ग दाखवणारं आहे. आदर्श नेतेपणाचं मूर्तिमंत उदाहरण असलेल्या नेल्सन मंडेलांचे गुण असामान्य असूनही अनुकरणीयतेच्या कक्षांपलीकडचे नाहीत. माणूस म्हणून अंगी असलेल्या गुणांनीच मंडेलांना जागतिक पातळीवरच्या नेतृत्वात सर्वोच्च स्थान कसं मिळवून दिलं आहे हे विविधांगानं दाखवून देणा-या या गोष्टी मनाला नक्कीच भावणा-या आहेत. प्रथमदर्शनी साध्या-सरळ वाटणा-या या गोष्टींमध्ये लहानथोर वाचकांना उदात्ततेकडे नेण्याची अमोघ शक्ति आहे. यू.आर. अनंतमूर्ति '

'Pages: 98 Weight:0 ISBN:978-81-8452-000-2 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:सप्टेंबर 2007 पहिली आवृत्ती:सप्टेंबर 2007 Illustrator:'

M.R.P ₹ 80
Offer ₹ 72
You Save
₹ 8 (10%)
Out of Stock