Vanmayeen Ugantar Ani Shri. Pu. Bhagvat | वाड्मयीन युगान्तर आणि श्री.पु. भागवत
मराठी साहित्यक्षेत्रात नववाङ्मयाचे युग घडवणा-या ‘सत्यकथा’ या नियतकालिकाच्या ‘ऑगस्ट १९८२’ या अंकाच्या संपादकीयात श्री. पु. भागवतांनी पुढील अपेक्षा व्यक्त केली होती : ‘ ‘सत्यकथे’च्या कार्याचे मूल्यमापन मराठी समीक्षक व वाङ्मयेतिहासकार आणि अर्वाचीन महाराष्ट्रीय संस्कृतीचे अभ्यासक यथाकाळ व यथायोग्यपणे करतील.’ श्री. पु. भागवतांची ही अपेक्षा प्रत्यक्षात पूर्ण करण्याच्या उद्देशाने २०२३ या त्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षात ‘वाङ्मयीन युगान्तर आणि श्री.पु.भागवत’ या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘मौज’ साप्ताहिक, ‘सत्यकथा’ मासिक आणि ‘मौज प्रकाशनगृह’; या तिन्ही विभागांनी वाङ्मय आणि कला या क्षेत्रांत श्री. पु. भागवतांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कार्याचे आणि या तिन्ही विभागांत श्री.पु. भागवतांनी केलेल्या संपादनाचे स्वरूप वस्तुनिष्ठ भूमिकेतून तपासण्याचा हा प्रांजळ प्रयत्न आहे. श्री. पु. भागवतांनी केलेल्या कार्याची गुणवत्ता आणि त्यातील त्रुटी निश्चित कराव्यात, तसेच ‘सत्यकथा’ आणि ‘मौज प्रकाशनगृह’ यांच्याद्वारे वाङ्मयीन युगान्तर खरोखरीच घडले काय, हे काटेकोरपणे तपासावे, हेही हेतू या ग्रंथाच्या निर्मितीमागे आहेत. या ग्रंथात ज्यांनी लेखन केलेले आहे, ते सर्व मराठीतील मान्यवर समीक्षक आणि अभ्यासक असून या सर्वांनीच आपले लेखन तटस्थपणे आणि शास्त्रीय लेखनाची शिस्त पाळून केले आहे.
आय.एस.बी.एन. नं. - 978-93-90324-70-5
पहिली आवृत्ती - डिसेंबर २०२३
मुखपृष्ठ व अंतर्गत मांडणी - शेखर गोडबोले
बाईंडिंग - हार्ड बाईंडिंग
आकार - ७.५ " X १० "
बुक कोड -L-01-2023
पृष्ठ संख्या - ३३६
वजन - ९७३