
Tarihi yeto vas fulanna | तरीही येतो वास फुलांना
भावकविता ही काही विशिष्ट संदर्भांतच रचली गेलेली असते आणि
त्या संदर्भांतच ती कृतार्थ होत असते. हे संदर्भ त्या कवितेवरूनच
कळून येत नसले, तर अन्य मार्गांनी जाणून घ्यावे लागतात.
ते नीट उमगले नाहीत, तर साहजिकच ती कविता दुर्बोध होते.
मर्ढेकरांच्या कित्येक कवितांत याचा पुरा प्रत्यय येतो.
मर्ढेकरांचा काळ आणि त्यांचे जीवन यांच्या संदर्भांतच त्यातील
प्रतिमा खुलू- बोलू लागतात. मर्ढेकरांच्या काही दुर्बोध कवितांना
हे संदर्भ पुरविण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखांत केलेला आहे.
त्यातून अकल्पितपणेच नऊ सलग कवितांचा एक मोनोड्रामा
साकार व्हावा हेच त्याच्या यशाचे आश्वासक गमक !
ISBN: 978-81-7434-142-6
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : एप्रिल १९९९
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
- राजहंस क्रमांक : D-06-1999