Sagarkatha | सागरकथा
'‘एच्.एम्.एस्. युलिसिस’ हे नाव ऐकल्यावर दुस-या महायुध्दात रशियाला रसद पोचवणा-या मालवाहू जहाजांचे संरक्षण करणारी युध्दनौका डोळ्यासमोर उभी राहते. जीवघेणी थंडी, यातना, रात्रंदिवस होणारे विमानांचे आणि पाणबुडयांचे हल्ले यांना तोंड देत जे नौसैनिक लढत होते त्यांचा पिंडच वेगळा होता. आणि तरीही ‘युलिसिस’ च्या नशीबी ‘बंड झालेले जहाज’ असा शिक्का बसलाच. झोप उडवणारी एक सागरकथा. स्केट उत्तर ध्रुवाखालून प्रवास करणारी नॉटिलस सर्वांना माहित आहे. पण स्केट या अणु पाणबुडीला उत्तर ध्रुवावरतीच ती पृष्ठभागावरती आणायच्या आज्ञा मिळाल्या होत्या. क्षणाक्षणाला आशा, निराशा,भाती, धोका यांचा सामना करत शेवटी पाणबुडीचा कप्तान आपला उद्देश तडीला नेतोच. या त्याच्या पराक्रमाचे वर्णन म्हणजेच स्केटची विजयगाथा. '
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५" X ८.५"
पहिली आवृत्ती : ऑगस्ट १९८६
सद्य आवृत्ती : ऑगस्ट १९८६
मुखपृष्ठ : राजू देशपांडे'