
Patanjal Yogdarshan | पातंजल योगदर्शन |
'॥पातंजलयोगदर्शन॥ - एक अभ्यास --
विविध संदर्भग्रंथांचा समावेश केल्यामुळे हा अभ्यासग्रंथ अतिशय
श्रीमंत झाला आहे. ज्या आनंदापासून तो उमलला आहे, त्या आनंदाचे
शिंपण लेखकाच्या शब्दातून होत आहे. आनंद ॠषींची भाषाशैलीही
अलंकृत व नितळ आहे. त्यांच्या झरणीतून अनेक वेळा ओशोंचा झरा
वाहतो आणि वाचक स्वत:ला विसरून त्यात डुंबायला लागतो.
-मा अमृत साधना फीचर संपादक, ओशो टाइअिम्स, पुणे. |
--आनंद ॠषींनी--विषयाची उकल करताना दुर्बोधता, क्लिष्टता,
संस्कृतप्रचुरता टाळून जास्तीत जास्त सुलभ व सोप्या शैलीत विषयाची
मांडणी, अनेक उदाहरणांसहित केली आहे.-- हा ग्रंथ वाचनीय, मननीय
व चिंतनीय आहे, यात शंका नाही.
--योगायार्च श्रीकृष्ण व्यवहारे संपादक, ठाणे -योगतरंग, ठाणे. |
--डॉ. मिकाओ उसुई यांच्या रेकी या योगोपचार पध्दतीचा पातंजल
योगावरच्या ग्रंथात समावेश करणारे आनंद ॠषी हे पहिलेच लेखक असावेत.
आनंद ॠषींनी योगशास्त्राबाबत मूलभूत विचार करून, सामाजिक, नैतिक,
आध्यात्मिक इत्यादी विविध दृष्टिकोनातून योगसूत्रांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न
केला आहे. ग्रंथ वाचनीय व्हावा याकडे त्यांनी विशेष लक्ष पुरविले आहे.
- डॉ. अर्जुनदास बात्रा (निवृत्त) तत्त्वज्ञान - प्राध्यापक पुणे विद्यापीठ. |
--योगसूत्रांच्या अर्थाच्या सूक्ष्म छटा, अध्याहृत अर्थ उलगडून दाखविण्यात
लेखक यशस्वी झाला आहे. लेखकाचा हा सखोल अभ्यास ओशोंच्या
अंतर्बोधावर आधारलेला असल्यामुळे, प्रस्तुत युगाच्या संदर्भात तो
समकालीन आहे.
--स्वामी सत्य वेदांत कुलगुरू, ओशो मण्टिवर्सिटी, पुणे. | '
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जानेवारी १९९७
- राजहंस क्रमांक : A-02-1997