
Manwantar | मन्वंतर
शनिवारवाड्यावरील जरीपटका ब्रिटिशांनी खाली उतरवला
आणि भारतात एक नवी व्यवस्था आकारास यायला सुरुवात झाली.
या संक्रमणकाळातील घडामोडींत आपल्या समाजापासून पोरका झालेला, ‘
नेटिवांचं भलं कशात आहे, जिंकण्यात की हरण्यात?’ ह्या प्रश्नाशी झगडत
स्वातंत्र्ययुध्दात सहभागी झालेला नर्मद. आणि एकविसाव्या शतकाच्या
सीमारेषेवर, सर्व मानवी विश्वच प्रचंड गतीने बदलत असताना, सामान्य
माणसाच्या बाजूने चळवळीत लढणारा, तरीही अंतिम परिणामाबद्दल
संभ्रमित असलेला गौतम. स्थळकाळाचे संदर्भ वेगळे...पण हे दोघेही
आपापल्या वर्तमानात शोध घेताहेत माणसामाणसातील नात्याचा,
त्याच्या भविष्याचा. संक्रमणकाळातील माणूस आणि समाज
यांचा शोध घेणारी कादंबरी.
ISBN: 978-81-7434-156-3
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : सप्टेंबर १९९९
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
- राजहंस क्रमांक : I-01-1999