 
            Mi mahammad khan shapthevar sangto ki | मी महंमद खान शपथेवर सांगतो की...
'महंमद आमिर खान-जुन्या दिल्लीतील
एका गरीब कुटुंबातील सालस मुलगा. दहावीच्या
परीक्षेनंतर कराचीत राहणाऱ्या आपल्या मोठ्या
बहिणीला भेटायला पहिल्यांदाच एकट्याने
निघतो. परंतु दिल्ली सोडण्याआधीच गुप्तहेर
यंत्रणेचे अधिकारी त्याला रस्त्यात गाठून
त्याच्यावर पाकिस्तानातून एक पाकीट
आणण्याची कामगिरी सोपवतात.
अजाणतेपणी तो या कामास होकार देतो.
पण कराचीत पोचल्यावर पोलिसांच्या
भीतीपोटी तो ते पाकीट फेकून देऊन
रिकाम्या हाताने दिल्लीला परततो.
आणि सुरु होतात त्याच्या दुर्दैवाचे दशावतार:
पोलिसांकडून अपहरण, गुप्तहेर यंत्रणेकडून
अनन्वित छळ, खोट्या साक्षीपुराव्यांसह
दहशवादी म्हणून तिहारमध्ये रवानगी,
तुरुंगात बेदम मारहाण आणि चौदा वर्षांची
एकांत कोठडी.
परंतु महंमद आमिरची कहाणी म्हणजे फक्त
एवढेच नाही. काळ्याकुट्ट अंधारातसुद्धा
शिक्षणाचा, सच्छीलतेचा आणि आशेचा दिवा
तेवत ठेवणाऱ्या जिद्दीचीसुद्धा ही कहाणी आहे.
‘मी महंमद खान शपथेवर सांगतो की...’ हे
निरपराध महंमद आमिरचे उद्वेगजन्य परंतु
चांगुलपणावरचा विश्वास अबाधित ठेवणारे
आत्मकथन होय.
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५' X ८.५'
- पहिली आवृत्ती : सप्टेंबर २०१७
- मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी
- राजहंस क्रमांक : I-05-2017
 
                             
      
                                