
Dr. Vishram Ramji ghole aani tyancha pariwar | डॉ. विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार
डॉ. विश्राम रामजी घोले.
अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यसमरात प्रत्यक्ष युद्धभूमीवर काम करणारे
निष्णात शल्यविशारद. पुण्यातल्या जहालांचे आणि मवाळांचे,
ब्राह्मणांचे आणि ब्राह्मणेतरांचे मित्र. शेती उद्योग, वैद्यक, शिक्षण...
अनेक क्षेत्रांतल्या विधायक उपक्रमांचे साथी. नगरपालिकेचे दीर्घकाळचे
जागरूक सेवाभावी सभासद. त्यांचे जावई डॉ. रघुनाथराव खेडकर हेही
प्रख्यात धन्वंतरी. कोल्हापूर संस्थानातच नव्हे, तर पुणे, भावनगर, नहान, नेपाळ -
सर्वत्र त्यांची कीर्ती पसरलेली. यादव समाजाचे अखिल भारतीय पातळीवरचे ते
पहिले संघटक नेते आणि वेदान्त तत्त्वज्ञानाची ध्वजा स्वामी विवेकानंदांच्या
पाठोपाठ इंग्लंड-अमेरिकेत फडकत ठेवणारे तेजस्वी धर्मप्रसारक.
या दोन बुद्धिमान आणि कर्तबगार माणसांची ही चरितकहाणी आहे.
ISBN: 978-81-7434-237-9
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : ऑगस्ट २००२
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
- राजहंस क्रमांक : H-01-2002