
Anokha Umbartha | अनोखा उंबरठा
विज्ञानाच्या झपाट्याने होणा-या प्रगतीने दिपून गेलेली मानवजात,
विसाव्या शतकाच्या विश्वरुप-दर्शनाने भयचकीत झाली.
विसाव्या शतकाने दिली दोन भीषण महायुद्ध आणि एकाहून एक
संहारक अस्त्रांची निर्मिती !
या अस्त्रांच्या अविवेकी वापराने मानवजातीचं अस्तित्वच धोक्यात
आलं.
एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर थबकलेल्या मानवजातीच्या
वाट्याला, उंबरठा ओलांडल्यावर काय होणार आहे ?
तिचा वारसा कोणता ?
तिच्या स्वागताला कोण असणार आहे ?
तिसरं महायुध्द, सद्दाम हुसेन, इथियोपिया, सोमालिया आणि
बोस्नियातली रणधुमाळी की, पेनिसिलीनचं पेटंट घ्यायला नकार
देणारे अलेक्झांडर फ्लेमिंग, गांधीजी यांच्यासारखे महात्मे ?
उपासमार की देवदुर्लभ समृध्दी ?
वि.गो.कुलकर्णी यांनी आपल्या चिंतनपर लेखनातून विसाव्या
शतकातील विज्ञानाच्या प्रगतीचं, त्याच्या दुष्परिणामांचं विश्लेषण
केलं आहे.
त्याचबरोबर एकविसाव्या शतकाचं संभाव्य चित्रं रेखाटलं आहे.
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : मे १९९७
- मुखपृष्ठ : अनिल दाभाडे
- राजहंस क्रमांक : E-02-1997