Home / Authors / Yashwant Ranjankar | यशवंत रांजणकर
Yashwant Ranjankar | यशवंत रांजणकर
Yashwant Ranjankar | यशवंत रांजणकर

यशवंत रांजणकर (जन्म : २३ जुलै १९३३; - १५ जून २०२०) हे मराठीतील पत्रकार, सुप्रसिद्ध साहित्यिक, कादंबरीलेखक, नाटककार, मराठी चित्रपट कथा-पटकथा-लेखक, अनुवादक आणि चरित्रलेखक होते. नाट्यलेखन, चित्रपट कथा-पटकथालेखन आणि संवाद लेखन करून त्यांनी त्यांच्या चौफेर व्यासंगाने व उपजत प्रतिभेने आपला वेगळा ठसा उमटवला होता. भयकथा, गूढकथा, विज्ञान-काल्पनिका, गूढ कादंबरी, फँटसी असे विविध विषयावरील कथा-कादंबऱ्या स्वरूपातील लेखनासाठी ते वाचकप्रिय होते. १९८० च्या दशकात गाजलेल्या अनेक मराठी चित्रपटांचे ते लेखक होते. त्यांनी किमान पन्नास पुस्तके लिहिली. त्यांची ५०हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

* यशवंत रांजणकर यांनी लेखन करण्यास प्रारंभ करण्यापूर्वी काही काळ एका बँकेत नोकरी केली. तेथे ते फार काळ रमले नाहीत. त्यानंतर मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात ते ग्रंथपाल होते. त्यानंतर त्यांनी लोकसत्ता मध्ये ते १९८० च्या दशकात चित्रपट विषयक साप्ताहिक 'लोकरंग'चे कार्यकारी संपादक होते. लोकसत्ता मध्ये त्यांनी वीस वर्षे काम केले.

रांजणकरांच्या हंस-मोहिनी मासिकांत प्रसिद्ध होत असलेल्या कथा व त्यांचे अन्य लेखन खूप लोकप्रिय होते.

*** रांजणकरांची साहित्य संपदा
* वृत्तपत्रातील सदरे
* अ-पूर्व चित्रलेणी (अंतर्नाद १९९६-९७)
* सोनाटा (दै. प्रहार)
* Best of हॉलीवूड-निर्मितीकथा आणि रसास्वाद ('सोनाटा ' सदराचे पुस्तक, २-३ लेख नव्याने समाविष्ट)

*** चरित्रे
* आल्फ्रेड हिचकॉक : द मॅन हू न्यू टू मच (चरित्र)
* लॉरेन्स ऑफ अरेबिया-जिवंतपणीच आख्यायिका बनलेल्या एका कलंदराचं चरित्र
* वॉल्ट डिस्ने- द अल्टिमेट फॅण्टसी (चरित्र)

*** नाटके
* गर्भश्रीमंत
* कादंबऱ्या
* ऐश्वर्यकुंड
* कजलीचंदा
* कालकन्यका
* खानदान
* घातचक्र
* चण्डिमठ
* चेतन चक्रवर्ती
* जिद्द
* तर्जनी
* नकटीच्या लग्नाला (?)
* नो-एक्झिट
* पंचरंग
* पाऊण लाखाची गोष्ट
* त्रिज
* धाकटी सून
* नंदिनी
* नवलनगरी
* पंचरंग
* पिशाच्चवधू
* बैरागपाडा
* भैरवगड
* मर्दाची कहाणी
* मुकाबला
* मैफल
* रत्नदीप
* रवींद्रजीवन
* रांजणवाडा
* रात्र संमोहिनी
* रुद्रतक्षक
* रुद्रप्रहार
* वेताळकोठी
* वृश्चिकमुद्रा
* वृश्चिकसंहिता
* शतानिक
* शेवटचा दिस
* श्वेतरेखा
* सापळा
* सुकन्या
* सिकंदर शह
* सूडसंभ्रम
* सौदा
* क्ष
* ज्ञात-अज्ञात
* कालनिद्रा (दोन कादंबऱ्या एकत्रित)
* त्रिशूळ (तीन कादंबऱ्या एकत्रित)

*** चित्रपट लेखन
* रांजणकर यांची कथा, पटकथा, संवाद असलेले काही महत्त्वाचे चित्रपट
* ते माझे घर (१९६३)
* करावे तसे भरावे (१९७५)
* शिक्का (१९७६)
* शापित (मराठी चित्रपट)(१९८२)
* अर्धांगी (१९८५)
* खरा वारसदार (१९८६)
* धाकटी सून (१९८६)
* कशासाठी प्रेमासाठी (१९८७)
* सर्जा (१९८७)
* आई पाहिजे (१९८८)
* झाकली मूठ सव्वा लाखाची (१९८९)
* जीवसखा (१९९१)

* यशवंत रांजणकरांचे ‘गर्भश्रीमंत’ हे नाटक त्याकाळी खूपच गाजले होते. ह्या नाटकासाठी, अर्धांगी (१९८५) चित्रपटाच्या पटकथेसाठी,

* तसेच 'अ-पूर्व चित्रलेणी' व 'वॉल्ट डिस्ने- द अल्टिमेट फॅण्टसी' या चरित्र लेखनासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने पुरस्कार प्रदान करून रांजणकरांच्या कार्याचा गौरव केला.

* वॉल्ट डिस्ने- द अल्टिमेट फॅण्टसी'ला महाराष्ट्र राज्य शासनाचा २००९चा 'उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती'साठीचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार लाभला.

Yashwant Ranjankar | यशवंत रांजणकर ह्यांची पुस्तके