Home / Authors / Vivek Velankar / Atul Kahate / Shreeram Geet | विवेक वेलणकर / अतुल कहाते / श्रीराम गीत
Vivek Velankar / Atul Kahate /  Shreeram Geet | विवेक वेलणकर / अतुल कहाते / श्रीराम गीत
Vivek Velankar / Atul Kahate / Shreeram Geet | विवेक वेलणकर / अतुल कहाते / श्रीराम गीत

विवेक वेलणकर - (बी.ई. ), एम.बी.ए.

* भारत व अमेरिकेतील औद्योगिक व संगणक क्षेत्रात पंधरा वर्षांचा अनुभव
* दहा वर्षे स्वत:ची सॉफ्टवेअर रिक्रुटमेंट फर्म.
* प्रकाशित साहित्य -
* स्वयंरोजगारातून समृद्धीकडे
* करीअर प्लॅनिंग
* आयटीतच जायचंय - १०वी/१२वी नंतरची शाखानिवड
* संपादन - पुणे-२०२० - वेध पुण्याच्या भविष्याचा (चार खंड)
* विविध वृत्तपत्रांतून करिअर, कॉम्प्युटर, स्वयंरोजगार व सामाजिक विषयांवर हजारांहून अधिक लेख प्रसिद्ध
* करीअर मार्गदर्शनपर सातशेहून अधिक व्याख्याने
* शेकडो विद्यार्थ्यांना करीअर काऊन्सिलिंग
* माहिती अधिकार कायद्याच्या प्रचार व प्रसारासाठी सजग नागरिक मंच या संस्थेची स्थापना, संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष
* पीएमपी प्रवासी मंच या संस्थेचे निमंत्रक
* माहितीचा अधिकार कायदा २००५ या विषयावर देशभरात आठशेहून जास्त व्याख्याने; आजवर चाळीस हजारांहून अधिक नागरिक व पाच हजारांहून अधिक सरकारी अधिकार्‍यांना प्रशिक्षण दिले.
* निसर्ग सेवक संस्थेचे संस्थापक सदस्य.
* रोटरी क्लबचे सक्रीय सदस्य.
* पुण्यगौरव, रोटरी समाज गौरव, समाजशिक्षक, सुखकर्ता, मोरया, सावरकर, विवेकानंद, जनजागर इ. विविध पुरस्कारांनी सन्मानित.

*** अतुल कहाते संख्याशास्त्राचे पदवीधर आहेत.

* एम.बी.ए. ही पदवीही त्यांनी प्राप्त केली आहे.

* माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सुमारे १८ वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. सिंटेल, अमेरिकन एक्स्प्रेस, डॉयचे बँक, एल अँड टी इन्फोटेक आणि आयफ्लेक्स सोल्यूशन्स (आता ओरॅकल) इथे डायरेक्टर पदासह विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.

* सिंबायोसिस, तसेच पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांत अभ्यागत व्याख्याता म्हणून एक दशकाहून अधिक काळाचा त्यांचा अनुभव आहे.

* इंग्रजीमध्ये ३० आणि मराठीत ४० अशी ७० पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.

* संगणक क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच प्रोफेशनल्ससाठी नेटवर्क सिक्युरिटी, वेब टेक्नॉलॉजी, ऑपरेटिंग सिस्टिम्स, डेटाबेस मॅनेजमेंट, डेटा कम्युनिकेशन्स, सी प्लस प्लस अशा अनेक पाठ्यपुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे.

* त्यातील अनेक पुस्तकांचा भारतातील तसेच विदेशांतील जवळपास ५० विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समावेश केला गेला आहे. त्यातील दोन पुस्तके चिनी भाषेत अनुवादित झाली आहेत.

* त्यांच्या क्रिप्टोग्राफी अँड नेटवर्क सिक्युरिटी या पुस्तकाच्या दीड लाखांहून अधिक प्रतींची विक्री झाली आहे.

* मराठीमध्ये इतिहास, अर्थशास्त्र, वैद्यकशास्त्र, राजकारण, विज्ञान, तंत्रज्ञान, चरित्र, क्रिकेट अशा वेगवेगळ्या विषयांवर पुस्तके लिहिली आहेत.

* त्यामधील अलीकडची पुस्तके - इम्रान खान, युद्धखोर अमेरिका, डोनाल्ड ट्रम्प, उत्तर कोरिया, कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, बखर संगणकाची, अंतराळ स्पर्धा.


*** पुरस्मकार

* मराठी साहित्य परिषदेचा ग्रंथकार पुरस्कार (दोन वेळा),
* उत्तम ग्रंथ पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार;
* संगणक क्षेत्रामधील योगदानासाठी इंद्रधनू-महाराष्ट्र टाइम्स पुरस्कार,
* कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया अवॉर्ड फॉर आयटी एज्युकेशन अँड लिटरसी,
* इंदिरा एक्सलन्स अवॉर्ड, सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्ड,
* जीआर फाउंडेशनचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार

अशा अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. अनेक मान्यवर वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे लेखन नियमितपणे सुरू असते.

* तसेच सर्व मराठी टीव्ही चॅनेल्सवर अनेक कार्यक्रमांत त्यांनी महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला आहे.

* क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांत स्कोअरर आणि आकडेवारीतज्ज्ञ म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

* महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत.

Vivek Velankar / Atul Kahate / Shreeram Geet | विवेक वेलणकर / अतुल कहाते / श्रीराम गीत ह्यांची पुस्तके