Home / Authors / Supriya Raj |सुप्रिया राज
Supriya Raj |सुप्रिया राज
Supriya Raj |सुप्रिया राज

सुप्रिया राज

* मास्टर ऑफ काँप्युटर अ‍ॅप्लिकेशन्स (MCA) ही आय. टी. मधील डिग्री घेतल्यावर मी स्वत:च्या आवडीनुसार मुलांबरोबर काम करायला सुरुवात केली.

* स्लो लर्नर्स, कॅन्सरने पीडित मुले, अनाथ िंकवा बेघर मुले, कायद्याप्रमाणे ज्यांच्या हातून गुन्हा घडला आहे असे बालक व तरुण अशा विविध प्रकारच्या मुलांबरोबर काम करायची संधी मला मिळाली. पुढे मी ''CORE values for
productivity & conflict resoulation या विषयात उद्योजकांना सल्ला व सोल्यूशन्स देऊ लागले.

* स्व.-शिक्षणाचे महत्त्व ओळखून आम्ही आमच्या दोन मुलींच्या शालेय शिक्षणासाठी होमस्कूिंलग सुरू केले. जेव्हा मालविका या आमच्या मोठ्या मुलीला बारावीच्या परीक्षेशिवाय Massachusetts Institue of Technology या अमेरिकेतील युनिव्हर्सिटीने प्रवेश दिला, तेव्हा आमची जगावेगळी शिक्षणपद्धती आणि माझे पालकत्व यांचे अनेक स्तरांवर कौतुक झाले. पण त्या कौतुकाला मी पात्र होते का, असा विचार मी केला; त्याचे उत्तर ‘नाही’ असे होते. कारण मुलांना, पालकांना किंवा उद्योजकांना सल्ला देणार्‍या माझ्या स्वत:च्या आयुष्यातली पोकळी मात्र मी भरून काढू शकले नव्हते. या जाणिवेतून संपूर्ण सत्याचा शोध घ्यायची मला ओढ वाटू लागली.

* २०१५ मध्ये मी माझा पहिला सोलो ट्रॅव्हल केला, ज्याची ही गोष्ट आहे. या ट्रिपनंतर आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडत गेले.

* कोव्हिडच्या काळात माझे कामकाज बंद पडले; तेव्हा फावल्या वेळात कोकणात घर बांधायचे असे ठरवले. `माझिरा' हे माझे सध्याचे राहाते घर बांधताना माझी आयुष्याशी आणखी जवळून ओळख झाली. शहरातील सोयीसुविधा सोडून कायमचे गावी राहायला जायचे, असे मी ठरवले.

* दु:ख आणि निराशेने व्यापलेले माझे स्वत:चे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. त्यापाठी जी जीवनप्रणाली होती, त्याला मी ‘स्लो आणि सोलो’ असे नाव दिले.

* तसेच वानप्रस्थाश्रम या विषयावरही माझे चिंतन सुरू होते. सध्या याच दोन विषयांतील माझ्या अभ्यासातून आणि अनुभवांतून इतरांच्या आयुष्यातही सकारात्मक बदल व्हावा, यासाठी ‘‘FOCCUS PROGRAM’’ या नावाची ऑनलाइन कार्यशाळा माझ्या आयुष्याचे मिशन समजून मी राबवत आहे.

मला संपर्क साधायचा असल्यास लिंक्स खाली दिल्या आहेत.

Whats App. : ८५९१७१६४४०
Facebook : /dearsupri
You Tube :ChaShak by Supriya

Supriya Raj |सुप्रिया राज ह्यांची पुस्तके