Home / Authors / Suhas Kirloskar | सुहास किर्लोस्कर
Suhas Kirloskar | सुहास किर्लोस्कर
Suhas Kirloskar | सुहास किर्लोस्कर

बँक आणि आय.टी क्षेत्रामध्ये विविध पदांवर कार्यभार सांभाळताना संगीतविश्लेषण, चित्रपटरसास्वाद आणि आनंददायी शिक्षण या क्षेत्रांत कार्यरत राहून त्यासंदर्भात लेखन सुरू केले. तबला, संवादिनी, सिंथेसायझर अशा
वाद्यांचे, हिंदुस्थानी रागसंगीताचे शिक्षण कला-आस्वादकाच्या भूमिकेतून घेता घेता संगीत, चित्रपट कलांचा रसास्वाद (Art appreciation)जाणतेपणाने घेऊन त्यामधील बारकावे सहज सोप्या शैलीमध्ये रसग्रहण करणारे सुहास किर्लोस्कर नव्या-जुन्या चित्रपटांमधील बारकावे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून, दृकश्राव्य कार्यक्रम आणि लेखनामधून मांडतात. चित्रपट आणि चित्रपटसंगीत, हिंदुस्थानी रागसंगीत मैफिलींचे विश्लेषण सांगणारे त्यांचे लेख त्या विषयाची गोडी लावणारे आणि बारकावे टिपणारे असतात. सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, तरुण भारत, साप्ताहिक सकाळ अशा नियतकालिकांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात.

आय. टी. क्षेत्रातील नोकरी सोडून विविध कलांचा रसास्वाद घेणारे सुहास किर्लोस्कर शिक्षणक्षेत्रातही कार्यरत आहेत. आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण, व्यावहारिक गणित, करियर गायडन्स, Interviewing skills अशा विषयांवर त्यांनी विविध शाळा-कॉलेजांमध्ये मार्गदर्शन केले आहे. वाचनकौशल्य विकसित करण्यासाठी ते १०० शाळांमध्ये अभ्यासवर्ग घेतात.

Suhas Kirloskar | सुहास किर्लोस्कर ह्यांची पुस्तके