Home / Authors / Ravi Paranjpe
Ravi Paranjpe
Ravi Paranjpe

रवी परांजपे (९ ऑक्टोबर १९३५ बेळगाव - ११ जून २०२२ [१] पुणे ) हे चित्रकार, बोधचित्रकार होते.

* ते भारतीय चित्रकला शैलीत चित्र काढत असत. त्यांनी प्रकाशन, जाहिरात, वास्तुशिल्पशास्त्र या क्षेत्रांत भारतामध्ये काम केले. नंतर त्यांनी नैरोबी, केन्यामध्ये काम केले.

* परांजपे यानी जागतिक कीर्तीच्या नियतकालिकांमधून संशोधनपर लेखन केले आहे.

*** पुस्तके
* नीलधवल ध्वजाखाली (लेखसंग्रह)
* ब्रश मायलेज (आत्मकथन)
* शिखरे रंग रेषांची (परदेशी चित्रकारांचा परिचय ग्रंथ)

*** सन्मान आणि पुरस्कार
* द बॉम्बे आर्ट सोसायटीचा रूपधर हा जीवनगौरव पुरस्कार (२०२२)
* ‘कम्युनिकेशन आर्ट्‌स गिल्ड हॉल ऑफ फेम’ हा जीवनगौरव पुरस्कार
* ‘द ग्रीन एकोज’ या निसर्गचित्राला मिळालेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार (२०१२)
* दयावती प्रतिष्ठानचा पुरस्कार
* ‘ब्रश मायलेज’ या पुस्तकासाठी भैरूरतन दमाणी पुरस्कार.
* शारदा ज्ञानपीठम्‌‍कडून ऋषितुल्य व्यक्ती म्हणून पूजन (६-९-२०१६)

Ravi Paranjpe ह्यांची पुस्तके